Uncategorized

हिंदु देवदेवतांचा समाजमाध्यमांवर अवमान करणाऱ्यांना अटक करा

हिंदू धर्माभिमानी नागरिकांचा वास्को पोलिस स्थानकात प्रचंड जमाव

प्रतिनिधी/ वास्को

हिंदू देवतांवर समाज माध्यमांद्वारे अवमानास्पद, विडंबनात्मक आणि अश्लाध्य टीका टिप्पणी करणाऱ्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी शनिवारी संध्याकाळी हिंदूबांधव भगिनीनी वास्को पोलिस स्थानकावर प्रचंड गर्दी केली. हिंदुंच्या भावना दुखावणे सहन केले जाणार नाही, असा इशाराही यावेळी जमावाने दिला.

हिंदु देवदेवतांचा अश्लाध्य शब्दात अवमान करून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. याचे पडसादही काही भागात उमटले. काल शनिवारी वास्को परिसरातील धर्माभिमानी हिंदुबांधव प्रचंड मोठ्या संख्येने वास्को पोलिस स्थानकासमोर एकत्र आले. आपल्या देवतांवर केलेल्या अवमानकारक टिप्पणीचा उल्लेख करून जमावाने त्या कृतीचा निषेध केला. हा गुन्हा केलेल्या एलीसबान मार्क मास्कारेन्हास, बाबीत फर्नांडिस, फन्स अँजेल, चेल्सा रॉड्रिक्स, लायनस रॉड्रिक्स यांनी केल्याचे स्पष्ट असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात व त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी हिंदू धर्माभिमानी नागरिकांनी केली. यावेळी त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांना सादर केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​