Uncategorized

सावंतवाडीत आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये महाकवी कालिदास दिन साजरा!

सावंतवाडी प्रतिनिधी : आयुर्वेद शिक्षणामध्ये संस्कृत भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे संस्कृत ही आयुर्वेद अध्ययनाची मूलभूत भाषा असून प्रत्येक आयुर्वेद विद्यार्थ्यासाठी तिचे ज्ञान आवश्यक आहे. असे प्रतिपादन सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या संस्कृत संहिता सिध्दांत विभागाचे प्रमुख डॉ. बी. पाटील यांनी केले.
सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये जिज्ञासा संस्कृत क्लब एवं संस्कृत संहिता सिध्दांत विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाकवी कालिदास दिन कार्यक्रमात डॉ बी डी पाटील बोलत होते. यावेळी नांदेड शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रा डॉ राजेशकुमार सवई, प्रा डॉ विशाल पाटील, प्रा. डॉ मुग्धा ठाकरे, प्रा. डॉ भारती घाडगे, जिज्ञासा संस्कृत क्लबच्या सचिव प्रा. डॉ शीतल पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी स्तवन व महाकवी कालिदास यांच्या पूजनाने झाली. यावेळी कॉलेजच्या प्रथम वर्ष बी. ए. एम. एस. (आयुर्वेदाचार्य) च्या विद्यार्थीनी आर्या पाटील, प्रज्ञा पोळ, निकिता मिश्रा, अनार्या यांनी कविकुलगुरु कालिदास यांचे संस्कृत साहित्यातील योगदान सविस्तरपणे कथन केले. तसेच त्यांच्या साहित्यिक योगदानावर भाषणे सादर करून संस्कृत भाषेचे संवर्धन व भारतीय ज्ञानपरंपरेतील तिचे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी संस्कृत संधि प्रश्न मंजुषेचे आयोजन करण्यात आले. यात कॉलेजच्या प्रथम वर्ष बी एम एस मध्ये विद्यार्थ्यांची दहा गटात विभागणी करण्यात आली. अत्यंत चुरशीच्या वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना नांदेड शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रा डॉ राजेशकुमार सवई यांच्याहस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन जिज्ञासा संस्कृत क्लबच्या सचिव प्रा. डॉ शीतल पाटील यांनी केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​