केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त वेर्लेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

ओटवणे प्रतिनिधी : माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेर्ले गावातील सर्व प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी वेर्ले गावाच्या शैक्षणिक विकासासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी सावंतवाडी उप तालुकाप्रमुख जीवन लाड, सावंतवाडी पंचायत समितीच्या आंबोली मतदार संघाचे सदस्य मायकल डिसोजा, माजी सरपंच चंद्रकांत राणे, सांगेली शिवसेना विभाग प्रमुख विनायक सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळा गावडे, सोमनाथ राऊळ, संजय घाडी, अनिल लिंगवत, माजी सैनिक बाळकृष्ण राऊळ, सदा कदम आदी स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी वेर्ले गावातील सर्व प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेर्ले गावात हा शैक्षणिक उपक्रम राबवल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक व ग्रामस्थांनी आभार मानले.
Source link



