Uncategorized

अर्जेंटिना की स्पेन ? आज निकाल

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा आज अंतिम सामना, स्पेनचा भर पारंपरिक पद्धतीवर, तर अर्जेंटिनाचा मेस्सीवर

वृत्तसंस्था, न्यू जर्सी : या वर्षाच्या सुऊवातीला कतारमध्ये दक्षिण अमेरिका आणि युरोपच्या विजेत्यांमधील ‘फायनालिसीमा’मध्ये अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात हिशोब चुकता होणार होता. परंतु इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांमुळे तो सामना रद्द करावा लागला. अखेर ते आज रविवारी न्यू जर्सीमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार असून यावेळी केवळ चषकापेक्षा बरेच अधिक काही पणाला लागलेले असेल. हा सामना भारतीय वेळेप्रमाणे आज रात्री 12.30 वा. सुरू होईल.

कतारमधील विजयानंतर चार वर्षांनी अर्जेंटिना पुन्हा अंतिम फेरीत परतला आहे. तिथे मेस्सीने फ्रान्सविऊद्ध चित्तथरारक विजय मिळवून अखेर चषक उंचावला होता. तेव्हा मेस्सी 35 वर्षांचा होता. त्याला आणखी एक विश्वचषक अंतिम सामना खेळणे अशक्य वाटत होते. पण आता 39 वर्षांचा असूनही तो अजूनही पूर्ण जोमाने कार्यरत असून बचावपटूंना चकविण्याचे काम तो तितक्याच प्रभावीपणे करत आहे.

अर्जेंटिनाच्या 26 सदस्यीय संघातील 17 खेळाडू 2022 च्या विजयाचा भाग होते. लायोनेल स्कालोनीच्या संघाने खडतर मार्गाने अंतिम फेरी गाठली आहे. केप व्हर्देला अतिरिक्त वेळेत हरवून आणि इजिप्त, स्वित्झर्लंड व इंग्लंडसोबतच्या अत्यंत तणावपूर्ण सामन्यांमधून स्वत:ला वाचविण्यात यश मिळवत त्यांनी ही झेप घेतली आहे. मेस्सीचे गोल, त्याने गोलांसाठी केलेली मदत आणि त्याच्या जादुई खेळाच्या जोरावर काही वेळा ते अगदी जीव ओतून खेळले आहेत. त्याच्या प्रत्येक सामन्याने इतिहासातील सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू तो की ब्राझीलचा पेले या कधीही न संपणाऱ्या वादात आणखी एक पान जोडले आहे.

सलग 37 सामन्यांत अपराजित राहिलेला स्पेनचा संघ 2010 नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकू शकतो आणि 2018 ते 2021 दरम्यान इटलीने प्रस्थापित केलेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अपराजित राहण्याचा विक्रम मोडू शकतो. युरोपियन चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर सट्टेबाजांची पसंती असलेला संघ म्हणून ते उत्तर अमेरिकेत दाखल झाले होते. दबावाला उत्कृष्ट पद्धतीने हाताळत त्यांनी आतापर्यंतची वाटचाल केली आहे.

स्पेनचे ‘पासिंग’ आणि जागा सांभाळून खेळण्याची शैली प्रतिस्पर्ध्याची कोंडी करू शकते. या पद्धतीत अप्रतिम आणि अनपेक्षित कल्पकताही दडलेली असते. त्यात बहुतांश वाटा यामालने उचलला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये आपल्या खेळाने सर्वांना मंत्रमुग्ध करण्राया या विंगरने अनेक विक्रम मोडीत काढलेले आहेत.

अंतिम सामन्यावर तेथील परिस्थितीचाही प्रभाव पडू शकतो. न्यू जर्सीमधील मैदान हे चेंडूवर ताबा ठेवून खेळणाऱ्या संघांसाठी फारसे अनुकूल ठरलेले नाही; स्पर्धेदरम्यान अनेक प्रशिक्षक आणि खेळाडूंनी या मैदानाच्या दर्जाबद्दल तक्रारी केल्या आहेत. यामुळे स्पेनची खेळण्याची लय विस्कळीत होऊ शकते आणि अर्जेंटिनाला त्याचा फायदा होऊ शकतो.  हवामानामुळेही या सामन्यात आणखी एक रंजक पैलू जोडला जाऊ शकतो. तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहून दिवस उष्ण आणि दमट असण्याची शक्यता आह. शिवाय, या विश्वचषकातील खुल्या स्टेडियममधील स्पेनचा हा केवळ दुसराच सामना असेल. कॅनडामधील वणव्याच्या धुरामुळे अमेरिकेच्या मिडवेस्ट आणि ईशान्येकडील भागांतील हवा घातक पातळीवर पोहोचली आहे. यामुळे अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहण्राया 80,000 हून अधिक चाहत्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दक्षिण अमेरिका वि. युरोप, मेस्सी वि. यामाल

विश्वचषकाचा अंतिम सामना फुटबॉलच्या या सर्वांत मोठ्या मंचावर एक विलक्षण दोन संघांमध्ये रंगणार आहे. अर्जेंटिना, जो पूर्णपणे जोशाने आणि लायोनेल मेस्सीच्या प्रभावाने भारलेला आहे, तर स्पेन हे युरोपियन विजेते असून त्यांनी  जे चेंडूवरील नियंत्रणाला जवळजवळ एका कलेचे स्वरूप दिले आहे. हा सामना दक्षिण अमेरिका विऊद्ध युरोप असून त्यात सर्वश्रेष्ठ खेळाडू मेस्सी किशोरवयीन स्टार लामिन यामालचा सामना करेल.

ब्राझीलनंतर सलग जेतेपदे पटकावणारा दुसरा संघ ठरण्याचे अर्जेंटिनाचे लक्ष्य

अर्जेंटिना आपले एकंदरित चौथे विजेतेपद मिळविण्याच्या आणि 1958 व 1962 मध्ये ब्राझीलने साधलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती घडवत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकणारा संघ बनण्याच्या प्रयत्नात आहे. या लढतीत अर्जेंटिनाचे प्रशिक्षक स्कालोनी यांचा सामना स्पेनचे प्रशिक्षक दे ला फुएन्ते यांच्याशी होईल, जे जवळपास एका दशकापूर्वी स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनच्या प्रशिक्षण वर्गात त्यांचे मार्गदर्शक होते. त्यामुळे या सामन्यातून एक प्रकारे शिष्य आपल्या गुरूशी भिडणार आहे.

या विश्वचषकात सहभागी झालो तेव्हा आमचे ध्येय विजेतेपद मिळवणे हेच होते आणि आम्ही ते साध्य करू शकतो याची आम्हाला खात्री होती. आम्ही हे सिद्ध केले आहे की, हा संघ बलाढ्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करण्यास सक्षम आहे.

– रोद्री, स्पेन


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​