Uncategorized
सातार्डा येथे वारकरी विद्यार्थ्यांचे टाळ नृत्य, भव्य दिंडी सोहळा

सातार्डा : आषाढी एकादशी निमित्त सातार्डा येथील महात्मा गांधी विद्या मंदिर हायस्कूलच्या वारकरी बाल विद्यार्थ्यांचे टाळ नृत्य तसेच भव्य दिंडी सोहळा शनिवार दि. 25 जुलै रोजी होणार आहे.
शनिवारी सकाळी 8 : 30 वाजता तरचावाडा येथून श्री रवळनाथ मंदिरापर्यंत भव्य दिंडी काढण्यात येणार आहे.
लक्षवेधी बाल वारकरी विद्यार्थ्यांचे टाळ नृत्य व भव्य दिंडी सोहळ्याने मंगलमय आषाढी एकादशीला ढोल ताश्यांच्या गजरात विठूरायाच्या जयघोषाने परिसर गजबजणार आहे.भव्य दिंडी सोहळ्यामध्ये पालक, ग्रामस्थ,शिक्षणप्रेमी व माजी विद्यार्थ्यांनी अवश्य सहभाग घ्यावा असे आवाहन महात्मा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत व शिक्षकांनी केले आहे.
Source link



