Uncategorized

शिक्षकांमुळेच सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अग्रस्थानी : प्रमोद कामत

ओटवणे प्रतिनिधी : आज सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात जो अग्रस्थानावर आहे, त्याचे खरे श्रेय इथल्या समर्पित आणि कर्तव्यदक्ष शिक्षकांना जाते. शिक्षकांच्या या कष्टाची आणि विद्यार्थ्यांच्या यशाची दखल घेणारी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना असुन या संघटनेचे विविध उपक्रम या कौतुकास पात्र आहे.” असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुका आयोजित मांगीरीश बँक्वेट हॉलमधील ‘विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव आणि सन्मान सोहळ्यात प्रमोद कामत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, अखिल शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष महादेव देसाई, राज्य सदस्य सृष्टी पाटील, श्री राजा कविटकर,अखिल संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वळवी, जिल्हा सचिव महेश पालव, महिला सेल जिल्हाध्यक्ष तेजस्विता वेंगुर्लेकर श्री भिवा सावंत, श्री रामा गावडे, श्री, बाबाजी झेंडे, श्री सुभाष सावंत, श्री प्रमोद पावसकर,श्री संजय शेडगे श्रीम भावना गावडे, श्रीम मृगाली पालव,आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील सर्व शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा खास सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. इयत्ता १० वी आणि १२ वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांचा पाहुण्यांच्याहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच या शैक्षणिक वर्षात विविध पातळीवर उल्लेखनीय कार्य करून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेल्या गुरुजनांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, नुकत्याच विभागीय स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होऊन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदी नियुक्ती मिळालेल्या सावंतवाडी तालुक्यातील शिक्षकांचाही संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला.

संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका सचिव रुपेश परब यांनी कार्यक्रमाचा हेतू आणि संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला सेलच्या तालुकाध्यक्ष शुभेच्छा सावंत यांनी तर महिला सेल तालुका सचिव रोशनी राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दीपक राऊळ, बापुशेट कोरगावकर,अरविंद सरनोबत, महेश सावंत, रोशन राऊत, वैष्णवी फाले, सीमा पंडित,सुरेंद्र विरनोडकर, मंगेश देसाई, रमेश शिंदे, राजेंद्र चव्हाण सुदर्शन बोराडे,रुपेश चौधरी, अनिल तालेवार, पंडित मैंद तसेच सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला सावंतवाडी तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​