Uncategorized

शाळा न्हावेली नं.२ नूतन इमारत नूतनीकरणाचे प्रमोद कामत व प्रितेश राऊळ यांच्या हस्ते उद्घाटन

न्हावेली /वार्ताहर : शाळा न्हावेली नं.२ नूतन इमारत नूतनीकरणचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमोद कामत यांनी आपले शिक्षण हे मातृभाषेतून झाले पाहिजे यासाठी प्राथमिक शाळा टिकविण्यासाठी आपण सर्व मिळून त्या टिकविण्यासाठी प्रयत्न करु यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
उद्घाटनप्रसंगी प्रितेश राऊळ यांनी तीनशे शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगितले.यावेळी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर,मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे,माजी केंद्रप्रमुख श्री.देसाई,विस्तार अधिकारी श्री. गावित न्हावेली तलाठी कोमल धांदे,माजी सरपंच एकनाथ परब,हेमचंद्र सावळ,ग्रामपंचायत सदस्य राजेश्वरी कालवणकर,सागर धाऊसकर,सविता परब,राजन कालवणकर,मोहन पालेकर तसेच शिक्षक वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री होडावडेकर तर आभार श्री कुंभार यांनी मानले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​