शनिवारच्या शालेय वेळापत्रकात बदल

सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 या वेळेत वर्ग भरणार : वेळापत्रकाचे पालन करण्याचे आदेश
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर : राज्य शिक्षण खात्याने शालेय वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. राज्यभरातील सर्व शाळांसाठी शनिवारची वेळ एकसमान लागू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक शनिवारी सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 या वेळेत शाळा भरणार आहे.
शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याच्या नवीन आदेशानुसार शनिवारी सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 पर्यंत वर्ग चालतील. यापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारच्या शालेय वेळापत्रकात फरक होता. काही शाळांमध्ये सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत वर्ग भरविले जात होते. तर काही शाळांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत तर काही ठिकाणी सकाळी 7:45 ते 11:45 पर्यंत वर्ग भरविले जात हेते. आता शिक्षण खात्याने सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना नवीन वेळापत्रकाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
नव्या नियमांमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे. राज्य सरकारने शाळांमध्ये ऑनलाईन हजेरी पद्धत लागू केल्यामुळे गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी नवे वेळापत्रक लागू केले असावे, असे म्हटले जात आहे. ऑनलाईन हजेरीचे दडपण असणाऱ्या शिक्षकांना नवीन वेळापत्रक दिलासा देणारे ठरेल, असे शिक्षण खात्याने म्हटले आहे.
वेळापत्रक
नव्या नियमांमुळे विद्यार्थी, शिक्षकांमधून समाधान
सर्व शाळांसाठी शनिवारची वेळ एकसमान लागू
Source link



