Uncategorized

मसापच्या विश्वस्तपदी डॉ.किरण ठाकुर यांची निवड

पुणे :  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्तपदी (मसाप) ‘तरुण भारत‘चे समूह प्रमुख व ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर (बेळगाव) यांच्यासह डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील (पुणे जिल्हा), साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य (पुणे शहर), सुधीर गाडे (पुणे शहर) आणि सुदाम सातभाई (नाशिक) यांची रविवारी निवड झाली.

साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाली. या बैठकीत एकमताने विश्वस्तांची निवड करण्यात आली. मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते एक कोटीचा निधी साहित्य परिषदेला नुकताच सुपूर्द करण्यात आला. या निधीतून कोणते उपक्रम घ्यायचे तसेच पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात येत असलेल्या 99 नांदी संमेलनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी प्रास्ताविक केले. कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी आभार मानले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​