देवसू वन परिमंडळातील २२ वर्षीय महिला वनरक्षकाची आत्महत्या

सावंतवाडी वार्ताहर : माडखोल येथे २२ वर्षीय महिला वनरक्षक आश्लेषा सागर मांगले हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी समोर आली आहे. त्या देवसू परिमंडळ मध्ये कार्यरत होत्या. या घटनेने वनविभागासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आश्लेषा मांगले या आजरा तालुक्यातील लाकुडवाडी येथील आहेत. त्यांचे बीएससी पर्यंत शिक्षण झाले तीन वर्षांपूर्वीच वनरक्षक म्हणून त्यांची भरती झाली. माडखोल येथे त्या राहत होत्या. आई वडील अधून मधून येऊन जाऊन राहत होते. तीन दिवसापूर्वी आई येऊन गेली होती. रविवारी तिने माडखोल येथील आपल्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेतल्याचे आज निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, पुढील वैद्यकीय व कायदेशीर सोपस्कारांसाठी त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे आणण्यात आला आहे. तरुण वयात वनविभागात सेवा बजावत असलेल्या आश्लेषा यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Source link



