भाऊ-बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

कणगिणी-बेतूल येथील घटना : कुडचडेवर शोककळा
कुडचडे : कुडचडे मतदारसंघात रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटनेमुळे शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनेत वस्तवाडा, कुडचडे येथील अवघ्या 10 वर्षांचा श्लोक संजय नाईक व 17 वर्षांची सानिका नाईक या भाऊ-बहिणीचा कणगिणी, बेतूल येथे कुटुंबीयांच्या सोबत सहलीला गेले असता ओहळातील पाण्यात बुडल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. सदर घटना रविवारी घडली असून त्या दिवशी दक्षिण गोव्यात बहुतेक ठिकाणी पूर्ण दिवस वीज खंडित होणार असल्याच्या कारणास्तव अनेक कुटुंबीयांनी सहलीचे प्रयोजन केले होते.
त्यात वस्तवाडा, कुडचडे येथील एक कुटुंब सहलीला गेले होते कणगिणी, बेतूल येथे सहलीला गेले होते. त्यावेळेस एका ओहळातील पाण्यात खेळत असताना अचानक कु. श्लोक नाईक हा बुडत असल्याचे निदर्शनास येताच त्याची बहीण सानिका हिने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न निष्फळ ठरला व सानिका बुडत असताना तिला बाजूला असलेल्या लोकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला व बाहेर काढले व ताबडतोब आरोग्य केंद्रात नेण्यात आले पण तिथे औषधोपाचर सुऊ असताना तिचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एकाच घरातील दोन मुलांच्या मृत्यूमुळे नाईक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच कुडचडे मतदारसंघात सर्वत्र शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी हळहळ व्यक्त केली आहे. सदर दोन्ही मृतदेहांवर सोमवारी दुपारी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी देव नाईक कुटुंबाला आणि त्यांच्या पालकांना शक्ती देवो, हीच सर्व नागरिकांच्यावतीने प्रार्थना केली जात आहे. श्लोक हा श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक हायस्कूलमध्ये व कु. सानिका ही श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक उच्च माध्यमिकमध्ये शिक्षण घेत होती.
Source link



