Uncategorized

ब्रोकन हार्ट सिंड्रोम आणि हार्टअटॅक यातील फरक ओळखणे होणार सोपे; स्वित्झर्लंडमध्ये नवीन रक्तचाचणी विकसित

झुरिच : ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ हा आजार आणि सामान्य हृदयविकाराचा झटका यांची लक्षणे सारखीच असतात. त्यामुळे या दोन्हींतील फरक ओळखण्यासाठी डॉक्टरांना अनेकदा ‘कार्डियाक कॅथेटरायझेशन’ सारख्या गुंतागुंतीच्या तपासण्या कराव्या लागतात. मात्र, आता यावर एक उपाय शोधण्यात आला आहे. स्वित्झर्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ झुरिच येथील संशोधकांनी ‘बायोटॅक’ स्कोअर नावाची एक नवीन निदान पद्धत विकसित केली आहे. याद्वारे कोणत्याही आक्रमक तपासणीशिवाय रुग्णाचा जीवघेणा त्रास ओळखता येऊ शकतो. ‘

बायोटॅक’ स्कोअर हा क्लिनिकल निर्णय घेण्यास मदत करणारा टूल आहे, ज्यामध्ये रुग्णाचे जैविक लिंग आणि रक्तातील काही विशिष्ट बायोमार्कर्स एकत्र करून तपासणी केली जाते. एआयच्या मदतीने हे बायोमार्कर्स शोधण्यात आले आहेत. १,८०० रुग्णांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, या नव्या पद्धतीमुळे कोणत्याही शस्त्रक्रियेशिवायकिंवा कॅथेटरायझेशनशिवाय जवळपास ९० टक्के रुग्णांमध्ये हा सिंड्रोम अचूकपणे ओळखल गेला. या चाचणीत सापडलेले बायोमार्कर्स तणाव, मज्जासंस्थ आणि मेंदू-हृदय संबंधांवर प्रकाश टाकतात. त्यामुळे हा आजार सामान्य हृदयविकारापेक्षा पूर्णपणे वेगळा कसा आहे, हे समजण्यास मदत होते.

उपचारांमध्ये कसा होईल फायदा ?

  • अतिदक्षता विभागात किंवा इमर्जन्सी केअरमध्ये छातीत दुखत असलेल्या रुग्णांवर उपचार करताना ‘बायोटॅक’ स्कोअरमुळे डॉक्टरांना योग्य तो निर्णय घेणे सोपे जाईल.
  • यामुळे रुग्णांची गरज नसलेली गुंतागुंतीची आणि त्रासदायक टेस्टिंग टाळता येऊ शकेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. हा अभ्यास नामांकित ‘युरोपियन हार्ट जर्नल’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​