Uncategorized

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना कुडाळ पोलिसांचा दणका

गुन्ह्याचा तपास व दोषारोपपत्र दाखल प्रक्रिया 12 तासात पूर्ण ; दोन चालकांना न्यायालयाने ठोठावला दंड व साधी कैद

कुडाळ/ वार्ताहर

रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा धोकादायक स्थितीत वाहन चालविणाऱ्या कंटेनर आणि कारच्या चालकांना कुडाळ पोलिसांनी दणका दिला. या दोघांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याची तपास प्रक्रिया अवघ्या 12 तासात यशस्वीपणे पूर्ण केली. सदर गुह्यात येथील न्यायालयाने सोमवारी दोन्ही चालकांना दंडात्मक शिक्षा ठोठावली.यात कंटेनर चालक राजेंद्र कुमार नरपाल सिंग ( 27 रा. बीजनौर -उत्तरप्रदेश ) याला येथील दिवाणी न्यायाधीश जी. ए . कुलकर्णी यांनी दोन कलमान्वये एकूण 16 हजार दंड व दंड न भरल्यास 25 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली,तर कारचालक सिद्धार्थ किशोर नरसुले ( 27 , रा.वेंगुर्ले – उभादांडा ) याला येथील न्यायाधीश श्रीमती एन.ए.बकरे यांनी 1हजार रु दंड व दंड न भरल्यास 2दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. याबाबतची माहिती अशी की, राजेंद्र कुमार नरपाल सिंग आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन कुडाळ एमआयडीसी येथून कुडाळ – वेंगुर्ले रस्त्यावरून कुडाळ -एस एन देसाई चौक मार्गे मुबई गोवा महामार्गाच्या दिशेने येणार होता. मात्र, येथील गवळदेव उतारापासून पुढे आल्यानंतर तेथील वळणानजीक त्याचे काहीसे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या दुभाजकाला कंटेनरची धडक बसली.या घटनेनंतर काही वाहनधारकांनी सदर कंटेनर काही अंतरावर अडवून कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिला. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घडली घडली.याबाबतची फिर्याद कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजू प्रभाकर दळवी यांनी दिली. राजेंद्र कुमार नरपाल सिंग याच्यावर भारतीय न्याय सहिता कलम 281 ,324 प्रमाणे गुन्हा दाखल केला.आज त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका कलमान्वये 1हजार रु दंड व दंड न भरल्यास 5 दिवस साधी कैद, तर दुसऱ्या कलमान्वये 15 हजार रु दंड व दंड न भरल्यास 20 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.या गुन्ह्यांचा तपास हवालदार सचिन गवस करीत आहेत.दरम्यान, सिद्धार्थ नरसुले याने आपल्या ताब्यातील कार सोमवारी सकाळी शहरात रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभी केल्याने वाहतूक कोंडी झाली.त्याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा धोकादायक स्थितीत कार उभी केल्याने कुडाळ वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय सहिता कलम 285 प्रमाणे गुन्हा दाखल केला.याबाबतची फिर्याद वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.सिद्धार्थ याला आज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 हजार रु दंड व दंड न भरल्यास 2 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक श्री अवताडे करीत आहेत. कुडाळचे प्रभारी अधिकारी जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गुन्ह्याचा तपास अवघ्या 12 तासात करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.दोन्ही गुन्हे न्यायालयात शाबीत झाले.आरोपींना शिक्षाही झाली.दरम्यान, जलद तपासामुळे कुडाळ पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रभारी अधिकारी श्री पाटील यांनी सांगितले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​