Uncategorized

बिजगर्णी येथे भरदिवसा घरफोडी

 त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : बेळगाव तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. सोनोली ता. बेळगाव येथे आपल्या घराबाहेर बसलेल्या वृद्धेला चाकूचा धाक दाखवत सुमारे 12 लाखांचा ऐवज पळविल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी बिजगर्णी येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

हनुमाननगर बिजगर्णी येथील जोतिबा रामा मोरे यांच्या घरी चोरी झाली आहे. जोतिबा हे आषाढीवारीनिमित्त पंढरपूरला गेले आहेत. घरात कोणी नसताना शुक्रवारी दुपारी कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने, पावणे दोन लाख रुपये रोख रक्कम, चांदीचे दागिने असा ऐवज पळविला आहे.

घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. या संबंधी रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला असून वेगवेगळ्या गावात सुरू असलेल्या चोरीच्या सत्रामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​