Uncategorized

बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शहाबुद्दीन यांचा राजीनामा

वृत्तसंस्था

ढाका

बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राजीनामा दिला असल्याचे त्यांच्या एका सहाय्यकाने शुक्रवारी सांगितले. त्यांच्या कार्यकाळाची अंदाजे दोन वर्षे शिल्लक असताना त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. 76 वर्षीय नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याच्या अफवांना जोर चढला होता. सध्या भारतात आश्रय घेतलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या संपर्कात असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता. मोहम्मद शहाबुद्दीन यांची एप्रिल 2023 मध्ये पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली होती. आता विद्यमान कॅबिनेट सचिव नसीमुल घनी यांचे नाव या सर्वोच्च पदाचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून घेतले जात आहे. तथापि, बांगलादेशच्या संविधानानुसार, नवीन राष्ट्राध्यक्षांची निवड होईपर्यंत शहाबुद्दीन हेच कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहतील.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​