Uncategorized

पाकिस्तानी इन्फ्लुएंसर भारतात मोस्ट वाँटेड

शहजाद भट्टीवर अनेक गुन्हे :

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्वत:ला उद्योजक, देशभक्त आणि धर्मरक्षक ठरविणारा पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शाहजाद भट्टी सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. सोशल मीडियावर ‘333’ बॅनर अंतर्गत व्हिडिओ तयार करणारा शाहजाद आता सीमेपलिकडून संचालित होणाऱ्या एका मोठ्या गुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्कचा मुख्य म्होरक्या ठरल्याचा सुरक्षा यंत्रणांचा आरोप आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने शनिवारी 9 दहशतवाद्यांना उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि गुजरातमधून अटक केली होती. हे दहशतवादी शाहजाद भट्टीच्या नेटवर्कशी संबंधित आहेत. तपास अधिकाऱ्यांनुसार हे दहशतवादी दिल्लीतील एक ऐतिहासिक मंदिर, दिल्ली-सोनिपत महामार्गावरील एक लोकप्रिय ढाबा आणि हरियाणातील एका सैन्यतळावर हल्ल्याचा कट रचत होता.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी शाहजाद हा पहिल्यांदा 2013 मध्ये पाकिस्तानात पोलिसांच्या रडारवर आला होता, त्यावेळी त्याच्यावर चोरी अन् दरोड्याचे गुन्हे नोंद झाले होते. त्यानंतर त्याच्यावर बलात्कारासह अनेक आरोपही झाले होते.

युएईत व्यवसायाचा दावा

2015 च्या आसपास भट्टी संयुक्त अरब अमिरातला स्थलांतरित झाला होता, तेथे तो स्क्रॅप ट्रेडिंग आणि डेअरीचा व्यवसाय चालविण्याचा दावा करतो. सध्या तो पाकिस्तान आणि आखाती देशांदरम्यान स्वत:चे लोकेशन बदलत राहतो.

भारतविरोधी कटांमध्ये हात

भट्टीचा संबंध पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी असल्याचा भारतीय सुरक्षा यंत्रणांचा आरोप आहे. भारतातील बेरोजगार युवांना कट्टरवादात लोटून भट्टी स्वत:च्या नेटवर्कचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. भट्टीच्या विरोधात दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनेक गुन्हे नोंद आहेत. एनआयएने देखील त्याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंदविले आहेत. मार्च 2024मध्ये पंजाबच्या जालंधरमध्ये एका इन्फ्लुएंसरच्या घरानजीक ग्रेनेड हल्ला भट्टीनेच करविला होता.

आयएसआयशी संबंध

आबिद जट्ट, अजमल गुर्जर आणि यावर खान यासारख्या आयएसआय हँडलर्सकडून त्याला पाठबळ मिळत आहे. त्याचे हे नेटवर्क फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूब यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे काम करते. हे नेटवर्क भारतातील युवांसोबत प्रायव्हेट मेसेजिंगद्वारे संभाषण करते आणि मग व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना भट्टीशी जोडले जाते. या युवांना पैसे आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवून देण्याच्या आश्वासनांसह शस्त्रास्त्रांचे व्हिडिओ आणि विदेशात स्थायिक होण्याच्या संधीचे आमिष दाखवत अडकविले जाते. प्रारंभी त्यांना छोटी कामे सोपविली जातात, यात एखाद्या ठिकाणाची छायाचित्रे किंवा व्हिडिओ शेअर करणे सामील आहे. मग त्यांना दहशतवादाच्या नेटवर्कमध्ये ओढले जाते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​