Uncategorized

डिंगडाँग, रेहान, शिवनेरी, एम.के. स्पोर्ट्स विजयी

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक’ निमंत्रिताची अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धा: झहीर, आदित्यला सामनावीर पुरस्कार

बेळगाव : कर्नाटक दलित संघर्ष समिती व भीमवेदी जयभीम युवक मंडळ कंग्राळ गल्ली आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून डिंग डॉंग स्पोर्ट्स, रेहान स्पोर्ट्स, एम.के.स्पोर्ट्स, बाळेकुंद्री, शिवनेरी  स्पोर्ट्स संघानी प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. मंजू, महांतेश, झहीर, आदित्य वारंग, आप्पा यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. सरदार्स हायस्कूलच्या मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात डिंग डाँग स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 95 धावा केल्या. रोहित पाटीलने एक षटकार 4 चौकारासह 27, आदित्य वारंगने 3 षटकार एक चौकारासह 23 धावा केल्या, चॉईस यमकनमर्डीतर्फे मुजाहिदने 10 धावात 3 तर महांतेशने 18 धावा 2 गडी बाद केले. त्यानंतर चॉईस इलेव्हनने  8 षटकात 6 गडी बाद 58 धावा केल्या. समीरने 2 षटकार, 2 चौकारासह 21 तर माऊतीने 17 धावा केल्या. डिंगडाँगतर्फे संकेत, स्वयम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

दुसऱ्या सामन्यात मिडिया इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 54 धावा केल्या. प्रवीणने 2 चौकारासह 14, तर गणेशने 10 धावा केल्या. रेहान स्पोर्ट्सतर्फे झहीर व इम्रान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर रिहान स्पोर्ट्सने 6.4 षटकात 6 गडी बाद 59 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. पिंटूने 2 षटकार 2 चौकारासह 25 तर इम्रानने 10 धावा केल्या. मिडियातर्फे मल्हारी व प्रवीण यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात बूम बूम हुक्केरी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी बाद 55 धावा केल्या. मिनोने 18 तर उजेफाने 11 धावा केल्या. शिवनेरीतर्फे आप्पाने 5 धावात 3 तर अभिने 12 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर शिवनेरी स्पोर्ट्सने 4 षटकात 2 गडी बाद 56 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. संदीपने 4 षटकार एक चौकारासह 35 तर मनोहरने 2 चौकारासह 16 धावा केल्या. बूम बूमतर्फे अल्लादिनने 2 गडी बाद केले.

चौथ्या सामन्यात गोल्डन स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 6 गडी बाद 33 धावा केल्या. इम्रान मुल्लाने 12 धावा केल्या. एम.के स्पोर्ट्सतर्फे मंजूने 12 धावात 3 तर शिवाने एक गडी बाद केला. त्यानंतर एम.के  स्पोर्ट्सने 4 षटकात 3 गडीबाद 34 धावा करून सामना 7 गड्यानी जिंकला. किरणने 3 चौकारासह 13 तर राजूने 10 धावा केल्या. गोल्डनतर्फे अजयने 2 तर राहुलने एक गडी बाद केला. पाचव्या सामन्यात रायगड संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी बाद 35 धावा केल्या. शुभम व राहुल यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. एम के स्पोर्ट्सतर्फे मंजूने 11 धावा 3 तर महांतेशने 6 धावात 2 गडीबाद केले. त्यानंतर एम के स्पोर्ट्सने 4 षटकात बिनबाद 37 धावा करून सामना 10 गड्यानी जिंकला. इरण्णाने एक षटकार 3 चौकारासह नाबाद 19 तर महांनतेशने एक षटकार 2 चौकारासह नाबाद 17 धावा केल्या.

मुंबईचे खेळाडू आज बेळगावात

सोमवारच्या सामन्यात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील मुंबईचे स्टार खेळाडू के.आर.शेट्टी संघात खेळणार तर रायगडचे खेळाडू पाटील आसोसिएट्स संघातून खेळणार आहेत.तरी सर्व क्रिकेट चाहत्यांनी या सामन्याचा लाभ घ्यावा.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​