झोळंबे पांडुरंग मंदिर येथे औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण

आयुर्वेदिक वनस्पती संशोधन व संवर्धन सहकारी संस्थेचा उपक्रम
ओटवणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दोडामार्ग येथील ‘आयुर्वेदिक वनस्पती संशोधन व संवर्धन सहकारी संस्थेच्या’ वतीने झोळंबे पांडुरंग मंदीर येथे औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण आणि औषधी वनस्पतींचे जतन करण्याच्या उद्देशाने आयुर्वेदिक वनस्पती संशोधन व संवर्धन सहकारी संस्थेच्या’ वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.झोळंबे पांडुरंग मंदिर परिसरातील जागेत विविध औषधी रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये कडुलिंब यांसारख्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या वनस्पतींचा समावेश होता. शाश्वत संवर्धनाचा संकल्प केवळ वृक्षारोपण करून न थांबता, या लावलेल्या प्रत्येक रोपाचे संवर्धन आणि संगोपन करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारली आहे. “आजच्या काळात निसर्गाचा समतोल राखणे आणि आपल्या प्राचीन आयुर्वेद परंपरेचे जतन करणे ही काळाची गरज आहे. नवीन पिढीला या वनस्पतींची ओळख व्हावी, हाच या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. वृक्षारोपणामुळे परिसरातून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी नागरिकांनीही आपल्या परसात किमान एक औषधी रोप लावावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित पांडुरंग झोळंबेकर, विशाल गवस, नारायण वझे, विनोद नाईक, श्री बर्डे, अमोल गवस, सुनिल वझे, संतोष वझे, गजानन परब, दत्ताराम कुंदेकर, गणेश वझे, समीर नाईक, गुरुदास गवस, आनंद गवस, रामा गवस विराज वझे आदी स्थानिक ग्रामस्थ आणि वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link



