Uncategorized

solapur crime | अल्पवयीन मुलीची फसवणूक आणि शोषण; गर्भपातासाठी औषधे देऊन मारहाण, सोलापुरात खळबळ

                        गर्भवती राहताच आई आणि नातेवाईकांच्या मदतीने गर्भपात

सोलापूर – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध करून ती गर्भवती झाल्यानंतर कुटुंबीयांच्या सांगण्यावरून गोळ्या देऊन गर्भपात करून पीडितेस मारहाण करणाऱ्या पाचजणांविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन सचिन मल्लिनाथ राठोड, विनायक राठोड, सचिन – राठोडची आई, कपिल राठोड, निकीता राठोड (सर्व रा. लक्ष्मीनगर तांडा, खेड पाटील, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील अल्पवयीन पिडीतेला – सचिन राठोड याने जून २०२१ मध्ये जून २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत बार्शी रोडवरील टोल नाक्याजवळील हॉटेल सुप्रभा लॉज, लोनावळा रेल्वे स्टेशनजवळील लॉज, साबळेश्वर टोळ नाका परिसरातील आर्यन लॉज, साबळेश्वर टोळ नाका परिसरातील रॉयल इन लॉज, हैद्राबाद रोडवरील दिपक लॉज, अक्क्लकोट रोडवरील गृहलक्ष्मी हॉटेल, हैद्राबाद रोडवरील महाराजा लॉज, महाबाळेश्वर येथील एका व्हीलामध्ये, हैद्राबाद रोडवरील इंद्रायणी लॉज या ठिकाणी नेऊन वेळोवेळी तिच्याशी जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुध्द शरीरसंबंध ठेवले.

त्यामुळे पिडीता ही गर्भवतीराहिल्यानंतर सचिन राठोड याने त्याच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरून पिडीतेचा गर्भपात होण्यासाठी तिला कोणत्यातरी गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केला व तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तसेच विनायक राठोड याने तु सचिनला सोडून दे, काय त्याच्या मागे लागली आहे, तो तुझा विचारसुध्दा करीत नाही, मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करतो, तुला काय पाहिजे ते देतो, तु माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव असे म्हणून तिच्या मनास लज्जा बाटेल असे कृत्य केले. त्याचप्रमाणे सचिन राठोडची आई, कपिल राठोड, निकिता राठोड यांनीदेखील पिडीतेला शिवीगाळ करून मारहाण करण्यासाठी अंगावर धाऊन गेल्या. म्हणून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक खंडागळे पुढील तपास करीत आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​