‘गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ जाहीर; किशोर वालावलकर यांना वसंतशेठ केसरकर स्मृती पुरस्कार

ओटवणे प्रतिनिधी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथील नामदार दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील गुणवंत आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा ‘गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ यंदाही जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे हे सलग तेरावे वर्ष असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
यावर्षी ‘वसंतशेठ केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ कलंबिस्त हायस्कूलचे शिक्षक किशोर अरविंद वालावलकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रेरणेने तसेच नामदार दीपक केसरकर मित्रमंडळाचे आबा केसरकर आणि नंदू गावडे यांच्या सूचनेनुसार पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यात आली. निवड समितीमध्ये भरत गावडे, महादेव देसाई, विठ्ठल कदम, अजय सावंत, डी. एस. पाटील आणि संजीवनी फडके यांचा समावेश होता.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ग्रंथभेट असे आहे. लवकरच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय ‘गुरुसेवा सन्मान’ पुरस्कारार्थी
सावंतवाडी तालुका : रुपेश दत्ताराम परब (इन्सुली शाळा क्र. 1), एकनाथ धोंगडे (ओटवणे हायस्कूल)
दोडामार्ग तालुका : अरुण वसंत पवार (कोलझर शाळा), सौ. पूर्वा संदीप गवस (पिकुळे हायस्कूल)
वेंगुर्ला तालुका : मनाली मंगेश कांबळी (आसोली प्राथमिक शाळा), मीनाक्षी अशोक काळे (वेंगुर्ला हायस्कूल)
कुडाळ तालुका : अरुणा घाटकर (नेरूर शिरसोद शाळा), सलीम तकीलदार (साळगाव हायस्कूल)
मालवण तालुका : अमर अशोक वाघमारे (घुमडे प्राथमिक शाळा), मधुरा माणगावकर (आचरा न्यू इंग्लिश स्कूल)
कणकवली तालुका : संतोष लक्ष्मण तांबे (माईण, शाळा क्र. 1), मुकेश बाळकृष्ण पवार (शिवडाव हायस्कूल)
देवगड तालुका : वर्षाराणी सतीशकुमार कर्ले (मीठमुंबरी शाळा), पौर्णिमा पुरुषोत्तम केरकर (वाडा हायस्कूल)
वैभववाडी तालुका : सुरेंद्र सुधीर साळुंखे (सोनाली शाळा क्र. 1), आनंद बाबुराव जाधव (करूळ बावडा हायस्कूल)
विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘विशेष सन्मान पुरस्कार’
विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांनाही यंदा ‘विशेष सन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.
या पुरस्काराचे मानकरी म्हणून रणजीत सावंत सावंत (सावंतवाडी शाळा क्र. 2), ज्योती दीपक परब (सांगेली केंद्र शाळा), रमेश लक्ष्मण शिंदे (डेगवे शाळा क्र. 1), स्वाती सचिन देसाई (कोनशी प्राथमिक शाळा), संजय मधुकर शेवाळे (इन्सुली हायस्कूल), रिया रामनाथ सांगेलकर (शिरशिंगे शाळा क्र. 1) आणि संजना संतोष गावडे (चौकुळ मराठी बेरडकी अंगणवाडी) यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Source link



