Uncategorized

खाडीत बुडून मच्छीमाराचा मृत्यू – Tarun Bharat

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील खालची केर येथील 50 वर्षीय मच्छीमार हिरोचन लक्ष्मण चोपडेकर यांचा खाडीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आज पहाटे सुमारे 5.30 ते 6.00 वाजण्याच्या दरम्यान ते खाडीपात्रात मासेमारीसाठी गेले असता हा दुर्दैवी प्रकार घडला.

चोपडेकर हे मासेमारी करत असताना पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, मच्छीमार तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळ सुरू असलेल्या शोधकार्यानंतर त्यांचा मृतदेह शोधून काढण्यात आला.

या घटनेमुळे खालची केर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चोपडेकर यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​