कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक परीक्षेत सिंधू पुत्रांचे यश

नंदकिशोर फोंडेकर व रोहन शारबिद्रे यांचा महाराष्ट्रात अनुक्रमे पाचवा आणि बारावा क्रमांक
ओटवणे : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक (राजपत्रिय अधिकारी गट अ) या परीक्षेत श्री पंचम खेमराज लॉ कॉलेज सावंतवाडीचे विद्यार्थी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र नंदकिशोर रामदास फोंडेकर व रोहन सदानंद शारबिद्रे यांनी महाराष्ट्रातून अनुक्रमे पाचवा आणि बारावा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिद्द, आत्मविश्वास आणि अथक परिश्रमातून नंदकिशोर फोंडेकर आणि रोहन शारबिद्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पदभरती प्रक्रियेत जवळपास ७००० परीक्षार्थींमधून हे यश प्राप्त केले आहे. या उल्लेखनीय कामगिरी बद्दल नंदकिशोर रामदास फोंडेकर व रोहन सदानंद शारबिद्रे यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेम सावंत भोसले, कार्याध्यक्षा सौ शुभदादेवी खेम सावंत भोसले, कार्यकारी विश्वस्त लखम खेमसावंत भोसले, विश्वस्त सौ श्रद्धाराजे भोसले, संचालक डी टी देसाई, सह संचालक अँड शामराव सावंत, सदस्य डॉ.सतीश सावंत, जयप्रकाश सावंत, डॉ दिलीप भारमल, लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अश्विनी लेले यांनी अभिनंदन केले आहे.
Source link



