Uncategorized

Ratnagiri News : कुंभारवाडीत गटारात अडकलेल्या गाईला जीवदान

लांजा : शहरातील कुंभारवाडी परिसरात महामार्गालगत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान तयार करण्यात आलेल्या गटारात एक गाय अडकून पडली होती. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी तसेच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी दाखल होत गाईला गटारातून काढत मानवतेचे दर्शन घडवले. 

सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक गाय गटारात अडकून पडल्याची घटना कुंभारवाडी येथे घडली होती. त्या गटारातून गाईला स्वतःहून बाहेर पडता येत नव्हते, या घटनेची माहिती मिळताच परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. यावेळी हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकोप्याचे दर्शन घडवत मदतीसाठी पुढाकार घेतला.  

तर याचवेळी लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे त्या मार्गावरून गस्त करत होते. त्यावेळेस त्यांनीही तत्परता दाखवत नागरिकांसोबत मदतकार्य केले. यानंतर घटनास्थळावरुन सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून गाईला सुखरूप गटातरातून बाहेर काढण्यात आले. या मदतकार्यात पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, राजू तुळसणकर, गौरव तेरवणकर, प्रसाद गुरव, लेझम मुल्ला, आजीम वणू तसेच गाईचे मालक वसंत कुंभार आदींनी सक्रिय सहभाग घेतला. तर गाईला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर उपस्थित नागरिकांनी मदतकार्याचे कौतुक केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​