Uncategorized

इराणच्या विमानांना लपविण्यासाठी पाकिस्तानची मदत

नूरखान वायुतळावर उपलब्ध केली जागा : पाकिस्तानचे मध्यस्थीचे ढोंग जगासमोर

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

पाकिस्तानने अमेरिका-इराण संघर्षादरम्यान इराणच्या सैन्य विमानांना स्वत:च्या वायुतळावर जागा उपलब्ध करू दिली होती असा दावा सीबीएस न्यूजने केला आहे. एप्रिल महिन्यात शस्त्रसंधीच्या घोषणेच्या काही दिवसांनी इराणने अनेक विमाने पाकिस्तानी वायुदलाच्या नूर खान वायुतळावर पाठविली होती असा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या दाखल्याने करण्यात आला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेच्या डोळ्यांत धूळफेक केल्याचा आरोप यामुळे होत असून अमेरिकेतील सत्तावर्तुळात याविषयी संताप दिसून येत आहे.

पाठविण्यात आलेल्या विमानांमध्ये इराणच्या वायुदलाचे आरसी-130 विमानही सामील होते. हे लॉकहीड सी-130 हर्क्यूलिस वाहतूक विमानाचे गुप्तचर अन् टेहळणी मिशनसाठीचे वर्जन मानण्यात येते. दुसरीकडे पाकिस्तानने इराणची विमाने स्वत:च्या वायुतळावर पोहोचल्याचे मान्य केले आहे. पाकिस्तानात इराणची विमाने युद्धविरामादरम्यान आली होती आणि त्यांचा कुठल्याही सैन्य अभियानाशी कोणताच संबंध नसल्याचा दावा पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने वक्तव्य जारी करत केला आहे.

अफगाणिस्तानातही पाठविली काही विमाने

इराणने काही नागरी विमाने अफगाणिस्तानात पाठविली होती असा दावा सीबीएस न्यूजच्या  अहवालात करण्यात आला आहे. माहान एअरचे एक विमान युद्ध सुरू होण्यापूर्वी काबूलमध्ये दाखल झाले होते. इराणचे हवाईक्षेत्र बंद झाल्यावर हे विमान काबूल विमानतळावरच थांबले होते असा दावा एका अफगाण नागरी उ•ाण अधिकाऱ्याने केला आहे. मार्च महिन्यात पाकिस्तान आणि तालिबान राजवटीदरम्यान तणाव वाढल्यावर काबूल विमानतळावर हल्ल्याची भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर तालिबानच्या नागरी उ•ाण अधिकाऱ्यांनी माहान एअरच्या विमानाला सुरक्षेच्या कारणास्तत्व इराण सीमेनजीकच्या हेरात विमानतळावर पाठविले होते. तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिदन यांनी अफगाणिस्तानात इराणी विमानांच्या उपस्थितीला नाकारले आहे.

इराण, चीनला नाराज करणे टाळले

-पाकिस्तान एकीकडे स्वत:ला अमेरिकेसमोर मध्यस्थ आणि स्थिरता आणणारा देश म्हणून सादर करत आहे. तर दुसरीकडे तो इराण आणि चीनला नाराज करण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतोय.

-मागील दशकात पाकिस्तानची चीनवरील सैन्य निर्भरता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2020-24 दरम्यान पाकिस्तानला 80 टक्के मोठी शस्त्रास्त्रs चीननेच पुरविली असल्याचे समोर आले आहे.

-पाकिस्तानच्या मध्यस्थीत इराण आणि अमेरिकेदरम्यान 11-12 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये पहिल्या फेरीतील चर्चा झाली होती. 21 तासांपर्यंत ही थेट चर्चा चालल्यावरही ती निष्फळ ठरली होती.

-अमेरिका आणि इराण दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण आणि आण्विक कार्यक्रमावर सहमती झाली नव्हती. यामुळे दोन्ही देशांदरम्यान मध्यस्थी करू पाहणाऱ्या पाकिस्तानची चांगलीच फजिती झाली होती.

इराणचा प्रस्ताव फेटाळला

इराणने रविवारी पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला एक प्रस्ताव सोपविला होता. इराणचा हा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळला आहे. या प्रस्तावात युद्ध संपविणे, पर्शियन उपसागर आणि होर्मुझ सामुद्रधुनीत सुरक्षा सुनिश्चित करणे, निर्बंध हटविणे आणि आण्विक कार्यक्रमावर चर्चा करण्याची तयारी इराणने दाखविली होती.

पाकिस्तानने इराणच्या विमानांना आश्रय दिला असल्यास त्याच्या ‘मध्यस्था’च्या भूमिकेबद्दल पुनर्विचार करावा लागणार आहे. इस्रायलच्या विरोधात पाकिस्तानच्या संरक्षण अधिकाऱ्यांची वक्तव्यं पाहता हे वृत्त खरे ठरल्यास मला किंचितही आश्चर्य वाटणार नाही.

लिंडसे ग्रॅहम, अमेरिकन सिनेटर


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​