नेपाळच्या पंतप्रधानांनी घेतली भारतीय राजदूताची भेट

पहिल्यांदाच एखाद्या विदेशी मुत्सद्यासोबत थेट चर्चा : काही वेळानंतर चिनी राजदूतासोबत बैठक
त् वृत्तसंस्था, काठमांडू
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सोमवारी भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान झाल्यावर एखाद्या विदेशी राजदूतासोबत शाह यांची ही पहिले प्रत्यक्ष भेट ठरली आहे. नवीन श्रीवास्तव यांनी शाह यांना पंतप्रधान झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच भारताच्या वतीने नेपाळसोबत चांगले संबंध आणि सहकार्य पुढे नेण्याचा मुद्दा मांडला आहे. श्रीवास्तव आणि बालेन शाह यांच्यादरम्यान भारत-नेपाळ संबंध, विकासाचे सहकार्य, परस्पर हितांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.
बालेन यांनी यावेळी भारतासोबत नेपाळचे जुने अन् मजबूत संबंध आणखी वृद्धींगत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. दोन्ही देशांदरम्यान व्यापार, वीज, रस्ते संपर्कव्यवस्था, पायाभूत आणि इतर विकासकार्यांमध्ये सहकार्य केले जात आहे.
चिनी राजदूताची भेट
भारतीय राजदूतानंतर शाह यांनी सोमवारी चीनचे राजदूत झांग माओमिंग यांची भेट घेतली आहे. तर मंगळवारी शाह हे अमेरिकेच्या दूतावासाचे प्रभारी अधिकारी स्कॉट अर्बोम यांच्याशी बैठक करणार आहेत. म्हणजेच शाह सलग तीन दिवसांमध्ये नेपाळच्या तीन महत्त्वपूर्ण भागीदार देशांच्या प्रतिनिधींसोबत थेट चर्चा करत आहेत. या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंधांसोबत विकास, संपर्कव्यवस्था, आर्थिक सहकार्य आणि वर्तमान मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
विदेशी अधिकाऱ्यांना भेटण्यास टाळाटाळ
पंतप्रधान झाल्याच्या प्रारंभिक काळात शाह यांनी विदेश मंत्रीच्या स्तरापेक्षा कनिष्ठ विदेशी अधिकाऱ्यांशी थेट चर्चा न करण्याचे धोरण अवलंबिले होते. ते विदेशी राजदूतांसोबत सामूहिक बैठकांना प्राथमिकता देत होते. याचमुळे भारतीय विदेश सचिव विक्रम मिसरी यांच्या 11-12 मे या कालावधीतील नेपाळ दौऱ्यादरम्यान शाह यांची त्यांच्याशी एकट्याने भेट होऊ शकली नव्ह्ती. शाह यांनी अमेरिकेचे अधिकारी समीर पॉल कपूर आणि सर्जियो गोर यांच्या भेटीची विनंतीही स्वीकारली नव्हती. याऐवजी बालेन शाह यांनी 9 एप्रिल आणि 26 मे रोजी काठमांडू येथे तैनात अनेक देशांच्या राजदूतांसोबत सामूहिक बैठका घेतल्या होत्या.
स्वत:चाच नियम मोडला
काठमांडू शहराचे महापौर असताना बालेन शाह यांनी विदेशी राजदूतांची एकट्याने भेट न घेण्याची भूमिका अवलंबिली होती. पंतप्रधान झाल्यावरही त्यांनी भारत, चीन आणि अमेरिका समवेत अनेक देशांचे राजदूत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वन-टू-वन बैठकांपासून अंतर राखले होते. शक्तिशाली देश नेपाळच्या शासकीय व्यवस्थेला बाजूला सारून थेट सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात असे शाह यांचे मानणे होते. सामूहिक बैठकांच्या माध्यमातून बालेन शाह हे सर्व देशांसोबत समानतेचे धोरण बाळगले जात असल्याचा संदेश देऊ इच्छित होते. परंतु सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यावर सल्लागारांनी त्यांना देशांतर्गत आणि विदेशी स्तरावर वेगवेगळ्या लोकांशी भेटण्याचा सल्ला दिला होता. यानंतर शाह यांनी नेते, उद्योजकांसोबत वन-टू-वन बैठका सुरू केल्या होत्या.
रणनीतीत बदल
विदेशी राजदूतांशी थेट भेट देखील याच बदललेल्या रणनीतिचा हिस्सा मानले जात आहे. दीर्घकाळापर्यंत थेट संवादापासून अंतर राखल्यावर नेपाळच्या कूटनीतिक संबंधांवरही प्रभाव पडण्याची चिंता तज्ञांकडून व्यक्त केली जात होती. याचमुळे नेपाळच्या पंतप्रधानांनी आता धोरणात बदलत थेट संपर्क प्रस्थापित करण्याचा निर्णय घेत त्यावर अंमलबजावणी सुरु केली आहे.
त्री पी. विश्वनाथन आणि टीव्हीकेच्या स्थानिक आमदारांनी सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. ‘तमिळ वाई वाझ्थू’ गीताचे रचनाकार प्रसिद्ध तमिळ विद्वान सुंदरम पिल्लई होते.
Source link



