Uncategorized

इतिहासातील सर्वात मोठा खजिना होता समुद्रात

जिब्राल्टरमध्ये मिळाली 134 जहाजांची ‘अंत्यभूमी’

स्पेनच्या पुरातत्वतज्ञांच्या नव्या शोधामुळे इतिहासाच्या पानांना पुन्हा पालटणे भाग पडले आहे. अल्जेसिरस बंदर आणि रॉक ऑफ जिब्राल्टरदरम्यान फैलावलेल्या उपसागरात प्राचीन जहाजांचा एक विशाल ताफा सापडला आहे. संशोधकांनी ख्रिस्तपूर्व 5 व्या शतकापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंतच्या 30 हून अधिक जहाजांच्या अवशेषांचे दस्तऐवजीकरण केले आहे. जिब्राल्टर सामुद्रधुनी नेहमीच युरोप आणि आफ्रिकेदरम्यान एक महत्त्वाचा दुवा राहिली आहे. हजारो वर्षांपासून या मार्गाने फोनिशियन आणि रोमन जहाजांपासून ब्रिटिश तसेच डच जहाजांना स्वत:च्या लाटांवर स्वार केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ काडिजच्या नेतृत्वात चाललेल्या या तीन वर्षांच्या प्रकल्पाने आतापर्यंत एकूण 151 ऐतिहासिक स्थळांची ओळख पटविली आहे. यातील 134 अशी स्थानं आहेत, जेथे जहाजं बुडाली होती. हा शोध केवळ लाकूड आणि लोखंडी अवशेषांचा नसून तर व्यापार, युद्ध आणि शोधाच्या अशा कहाण्यांचा पुरावा आहे, ज्या समुद्रात शतकांपासून दडलेल्या होत्या.

प्रोजेक्ट हेराक्लेस

युनिव्हर्सिटी ऑफ काडिजचे प्राध्यापक फेलिप सेरेजो एंड्रेओ या पूर्ण संशोधनाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या मिशनला ‘प्रोजेक्ट हेराक्लेस’ नाव दिले आहे.  त्यांच्या टीमने आतापर्यंत 34 जहाजांच्या अवशेषांचे बारकाईने अध्ययन केले अहे. यात सर्वात जुने जहाज पुणिक काळाती असून ते ख्रिस्तपूर्व 5 व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. याचबरोबर टीमला 23 रोमन जहाजं, चार मध्यकालीन जहाजंही मिळाली आहेत. आधुनिक काळातील 24 जहाजं देखील या यादीत सामील आहेत.

या शोधांमध्ये केवळ जहाज नव्हेतर 1930 च्या दशकातील एका विमानाचे इंजिन अन् प्रोपेलरही मिळाले आहे. हा भाग नेहमीच एक ‘बॉटलनेक’ राहिला असून तेथून प्रत्येक जहाजाला जावे लागत होते. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने प्रत्येक काळ पाहिला आहे. येथे वेगवेगळ्या संस्कृती आणि देशांची जहाजं मिळणे या जागेचे रणनीतिक महत्त्व दर्शविते.

मध्यकालीन जहाजांमुळे रहस्याची उकल

प्रोफेसर सेरेजा आणि त्यांच्या टीमसाठी सर्वात रोमांचक शोध तीन मध्यकालीन जहाजं आहेत. दक्षिण स्पेनमध्ये इस्लामिक राजवटीचा अखेरचा काळ सुरू असतानाची ही जहाजं आहेत. या जहाजांद्वारे त्या काळातील सागरी प्रवास आणि तंत्रज्ञानाविषयी नवी माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

स्पॅनिश गनबोट

या प्रकल्पादरम्यान 18 व्या शतकातील एक छोटी स्पॅनिश गनबोट ‘पुएंते मेयोर्गा 4’चे अवशेष मिळाले आहेत. ही गनबोट त्या काळात ब्रिटिश जहाजांवर अचानक हल्ला करण्यासाठी निर्माण करण्यात आली होती. या नौका अनेकदा स्वत:ला मासेमारी करणाऱ्या नौकांच्या रुपात दडून रहायच्या आणि मग अचानक हल्ला करायच्या. प्राध्यापक सेरेजो यांना एक लाकडाची पेटी मिळाली असून ती पुस्तकासारखी दिसते. या पेटीत लाकडी कंगवे मिळाले आहेत. यातून युद्धादरम्यान देखील संबंधित अधिकारी स्वत:च्या ग्रूमिंगवरून अत्यंत काळजी घेत होता असे कळते.

वैज्ञानिकांसमोरील आव्हान

एवढ्या मोठ्या शोधानंतर आता वैज्ञानिकांसमोर सर्वात मोठे आव्हान हा खजिना वाचविण्याचे आहे. बंदर विकास, ड्रेजिंग आणि डॉक निर्मिती यासारख्या कामांमुळे या ऐतिहासिक स्थळांना मोठे नुकसान पोहोचत आहे. हवामान बदल देखील एक मोठा धोका ठरला आहे. समुद्राची वाढती पातळी मातीच्या थरांना बदलत असल्याने हे प्राचीन अवशेष समोर येत आहेत. याचबरोबर एक खास प्रकारचा सागरी शेवाळ म्हणजेच इनवेसिव एल्गी देखील या अवशेषांवर वेगाने फैलावत आहे. प्राध्यापक सेरेजो यांनी स्पेनच्या सरकारला या स्थळांना संरक्षित घोषित करण्याचे आवाहन केले आहे.

सर्वसामान्यांना पाहता येणार

या शोधांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संशोधकांनी नव्या तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. टीमने या स्थळांचे वर्च्युअल मॉडेल आणि 360 डिग्री व्हिडिओ तयार केले आहेत. त्यांना ऑनलाइन आणि स्थानिक संग्रहालयात पाहिले जाऊ शकते. लोकांना व्हीआर गॉगल्सद्वारे ‘ड्रायलँड डायविंग’चा अनुभव करवितो, परंतु समुद्राखाली ही जहाजं एखाद्या फिल्मप्रमाणे चमकताना दिसून येत नाहीत, परंतु त्यांचे ऐतिहासिक मूल्य अत्यंत अधिक आहे. हा छोटासा सागरी भाग पूर्ण आयबेरियन बेट आणि उत्तर आफ्रिकेच्या सागरी इतिहासाच्या विकासाला समजून घेण्याचे एक प्रभावी माध्यम आहे, असे सेरेजो यांनी सांगितले आहे.

व्यापारी मार्गाची नवी माहिती मिळणार

जिब्राल्टर सामुद्रधुनीत मिळालेली ही जहाजं हा मार्ग शतकांपासून जागतिक व्यापाराचे केंद्र राहिल्याचे सिद्ध करतात. येथे डच, वेनेशियन, स्पॅनिश आणि इंग्लिंश जहाजं मिळाल्याने हा मार्ग जगातील प्रत्येक शक्ती वापरत होती हे स्पष्ट होते. अटलांटिक महासागरातून भूमध्य सागरात प्रवेश करण्यासाठी हा सर्वात मुख्य मार्ग होता. या जहाजांच्या अवशेषांमधून त्या काळातील अर्थव्यवस्था आणि व्यापारी वस्तूंविषयीही महत्त्वाची माहिती मिळते.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​