Uncategorized

अनाहत सिंग स्क्वॅशची ‘ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन’

एकेरीत ऐतिहासिक यश मिळविणारी पहिली भारतीय

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताची नंबर वन महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंगने वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकावत ऐतिहासिक यश मिळविले. हा पराक्रम करणारी ती भारताची पहिली खेळाडू बनली आहे. कॅनडातील ओन्टारिओ येथे ही स्पर्धा सुरू आहे.

जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानावर असणाऱ्या अनाहतने इजिप्तच्या रुकाय्या सालेमचा 11-3, 11-7, 11-9 असा पराभव करीत स्वप्नवत कामगिराr केली. विजेतेपद पटकावल्यानंतर अनाहत म्हणाली की, ‘हे माझ्यासाठी खूप काही आहे. मला अजूनही स्वप्न पाहिल्यासारखे वाटत आहे. गेल्या चार वर्षापासून मी उपांत्य किंवा उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होत होते. कोणीही विचारले असता मी म्हणायचे की, ही स्पर्धा माझ्यासाठी शापासारखी होती,’ असेही ती म्हणाली. ज्युनियर स्तरावरील स्पर्धेत खेळण्याचे तिचे हे शेवटचे वर्ष असल्याने हे जेतेपद तिच्यासाठी स्पेशल ठरले आहे. कनिष्ठ स्तरावर माझे हे शेवटचे वर्ष असल्याने ही स्पर्धा मला जिंकण्याची ही शेवटची संधी होती. त्यामुळेच हे यश माझ्यासाठी खास ठरले आहे. जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचा प्रत्येक क्षण मला आनंदाने जगायचा होता. तणावाखाली असताना माझी कामगिरी खराब होते. म्हणून मी फक्त कोर्टवर उतरले आणि अचूक फटके मारण्यावर लक्ष केंद्रित केले,’ असेही ती म्हणाली.

देशातील स्क्वॅशसाठी हा ‘ऐतिहासिक क्षण’ असल्याचे स्क्वॅश फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस सायरस पोंचा यांनी या यशाचे वर्णन केले. ‘भारताने दुहेरीत जागतिक जेतेपद मिळविले होते. पण एकेरीत असे यश मिळण्याचे स्वप्न दिवंगत एन. रामचंद्रन यांनी पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न अनाहतने साकार केले आहे. या यशात अनाहतची खूप मेहनत व प्रयत्न आहेत. गेल्या काही वर्षांत देश तिच्या पाठीशी उभा असून तिच्या यशात सर्वांचाच वाटा आहे,’ असेही सायरस म्हणाले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​