अतिरिक्त पदवीधर शिक्षक समायोजन प्रक्रियेस स्थगिती द्या

प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
सावंतवाडी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार दीपक केसरकर यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त पदवीधर शिक्षक समायोजनाबाबत असलेल्या समस्यांची सविस्तर माहिती देऊन सदर समायोजन प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आमदार दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची तातडीने भेट घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करून सदर समायोजन प्रक्रियेस स्थगिती देण्याबात मंत्री भुसे यांच्याकडे आग्रही मागणी केली. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्याशी चर्चा करून सदर विषय समजावून सांगितला व पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाबाबत समस्या सांगितल्या. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून उचित कार्यवाही करण्याची आग्रही मागणी केली..शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर यांच्याशी दूरध्वनी द्वारे चर्चा करून आवश्यक निर्देश दिले आहेत. यावेळी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्गचे पदाधिकारी दयानंद नाईक , राजा कविटकर, दादा जांभवडेकर, महेश गावडे, सुशांत मर्गज, नंदकुमार राणे, संतोष देसाई, निलेश ठाकूर व इतर संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
Source link



