Uncategorized

Strong start for India’s men’s and women’s teams

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

येथे सुरू झालेल्या 22 व्या राष्ट्रकुल टेबलटेनिस स्पर्धेत टॉपसिडेड भारताच्या पुरूष आणि महिला संघांनी सलामीच्या लढतीमध्ये अनुक्रमे झिम्बाब्वे आणि मालदिव यांचा 3-0 अशा फरकाने पराभव करत आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ केला.

पुरूषांच्या विभागातील खेळविण्यात आलेल्या पहिल्या लढतीमध्ये भारताच्या मानव ठक्करने झिम्बाब्वेच्या मुमहुमाचा 11-3, 11-2, 11-6 अशा गेम्समध्ये पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताच्या अनुभवी हरमित देसाईने झिम्बाब्वेच्या मुसारुरेवाचा 11-5, 11-4, 11-5 तसेच तिसऱ्या सामन्यात भारताच्या पायस जैनने झिम्बाब्वेच्या विक्रम सिंगचा 11-3, 11-3, 11-8 असा पराभव करत आपल्या संघाला 3-0 अशा फरकाने विजय मिळवून दिला. गट अ मधील हा सलामीचा सामना भारताने एकतर्फी जिंकला. याच गटातील दुसऱ्या एका सामन्यात मलेशियाने वेल्सवर 3-0 अशी मात केली. ब गटातील लढतीत ऑस्ट्रेलियाने जमैकावर 3-0 तर नामिबियाने द. आफ्रिकेवर 3-0 अशी मात करून पुढील फेरी गाठली. ड गटातील लढतीत कॅनडाने स्कॉटलंडचा 3-0 तसेच सिंगापूरने उत्तर आयलर्डंचा 3-0 असा फडशा पाडला.

महिलांच्या विभागातील ब गटात खेळविण्यात आलेल्या सलामीच्या लढतीत भारताने मालदिवचे आव्हान 3-0 असे संपुष्टात आणले. भारताच्या सुतीर्थ मुखर्जीने मालदिवच्या धिमा अलीचा 11-4, 11-2, 11-5, यशस्वीनी घोरपडेने मालदिवच्या नाझीमचा 11-2, 11-5, 11-7 तसेच तिसऱ्या सामन्यात स्वस्तीका घोषने मालदिवच्या मिशाखा मोहम्मद इब्राहीमचा 11-3, 11-5, 11-2 असा पराभव केला. अ गटातील अन्य एका सामन्यात टॉमसिडेड सिंगापूरने लंकेवर 3-2 अशा फरकाने निसटता विजय मिळविला. उत्तर आयर्लंडने द. आफ्रिकेचा 3-2, ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा 3-0, इंग्लंडने सायप्रसचा 3-0, मलेशियाने स्कॉटलंडचा 3-0 असा पराभव केला तर क गटातील सामन्यात बोसवानाकडून कॅनडाला पुढे चाल मिळाली.

ऑस्ट्रेलियाला सुवर्णपदक

2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरूषांच्या 4×200 मी. फ्रिस्टाईल रिले सांघिक जलतरण प्रकारात ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक मिळविताना 7 मिनिटे 0.1.47 सेकंदाचा अवधी घेताना नवा राष्ट्रकुल स्पर्धाविक्रम नोंदविला. या क्रीडा प्रकारात इंग्लंडने 7 मिनिटे 04.98 सेकंदाचा अवधी घेत रौप्य पदक तर वेल्सने 7 मिनिटे 0.9.59 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक पटकाविले. मात्र या क्रीडा प्रकारात भारताला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतातर्फे या क्रीडा प्रकारात शशीकुमार, अनिश गौडा, आर्यन नेहरा आणि श्रीहरी नटराज यांनी प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी या क्रीडा प्रकारात 7 मिनिटे 29.84 सेकंदांचा अवधी घेतला.

भारताचे आव्हान समाप्त

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या व्हिलचेअर 3×3 बास्केटबॉल क्रीडा प्रकारातील लढतीत भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. या सामन्यात नायजेरीयाने भारताचा 7-6 असा निसटता पराभव केला. या क्रीडा प्रकारात रिना गुप्ता, रिटू चानु आणि मिनाक्षी जाधव यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​