Uncategorized

Solapur Enchrochment सोलापूरातील एमआयडीसी सुनीलनगर परिसरातील अतिक्रमणे निष्कासित

त. भा. संवाद प्रतिनिधी, सोलापूर

शहरातील अतिक्रमणांविरोधात सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने कारवाईची मोहीम सुरू ठेवत अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी सुनीलनगर परिसरात मोठी कारवाई केली. या कारवाईत रस्त्यालगत उभारण्यात आलेले १६ अनधिकृत पत्राशेड व बांधकामे निष्कासित करण्यात आली.

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार तसेच अतिक्रमण नियंत्रण अधिकारी नीलकंठ मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांच्यासह विभागीय कर्मचारी यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. संबंधित अतिक्रमणांमुळे रस्त्याची जागा अडवली जात असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही मोहीम राबविण्यात आली.

यावेळी अनधिकृत पत्राशेड व बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. अतिक्रमणांविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​