अवकाळी पावसामुळे नेमळेतील आंबा बागायतदार संकटात

नेमळे –
गेले दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नेमळे कामळेवीर परिसरात ठिकठिकाणी झाडे मोडून पडण्यासह विजेचे पोल मोडून पडले. विद्युत वाहिनी तुटल्यामुळे अजूनही काही ठिकाणी विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठया प्रमाणात बसला असून आंबा बागायतीमध्ये वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या फांदया पेचून पडल्याने हातातोंडाशी आलेल्या आंब्याचे नुकसान झाले आहे. जमिनीवर पडलेले आंबे पिकवण्या लायक नसल्याने कॅनिंग साठी घेऊन गेल्यावर कॅनींग चाही दर उतरल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच विपरीत हवामानामुळे आंबा ,काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महागडी कीटक नाशके फवारणी करूनही आंबा काजूवर फळधारणा नसल्याने तसेच सध्या अवकाळी पाऊस, वादळीवारे,आणि अति उष्णता यामुळे आंबा पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने आंबा नुकसान भरपाई जाहीर करूनही आद्याप खात्यात जमा झाली नसल्याने आंबा बागायतदार शेतकरी चिंतेत आहेत .
Source link


