Sangli News | दुपारच्या शांततेत बेडग हादरलं! भरलेल्या सिलिंडरचा भीषण स्फोट; अवशेष थेट ५०० फूट हवेत उडाले

बेडगमध्ये सिलिंडर स्फोटाने उडाला थरकाप; संपूर्ण घर जळून खाक
बेडग: बेडग (ता. मिरज) येथे ८. विठ्ठलनगर भागात राहत्या घराला 1 आग लागून सिलिंडरचा स्फोट झाला. रविवारी दुपारी ही घटना . घडली. फुटलेल्या सिलिंडरचे अवशेष सुमारे पाचशे फूट आकाशात उंचावर न उडाले. या आगीच्या घटनेत संपूर्ण संसार जळून खाक झाला. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बेडगेतील विठ्ठलनगर न येथील संजय प्रकाश आवटी यांचे शेतात पत्र्याचे शेडवजा घर आहे.सदर घरात भरलेल्या सिलिंडर टाकीसह काही संसारापयोगी साहित्य ठेवले आहे. मात्र आवटी कुटुंबीय गावातील घरात राहण्यास आहेत. दुपारी शेतातील घरात कोणीही नसताना आगीचा भडका उडाला.
त्यामुळे गॅस टाकीने पेट घेतला. काही क्षणातच गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. आवाजाने परिसरात घबराट पसरली. ग्रामस्थ धावत आले. तोपर्यंत सिलिंडरटाकीच्या स्फोटामुळे घराचे छत उडून गेले होते. फुटलेल्या टाकीचे अवशेष आकाशात पाचशे फुट उंचावर उडून विठ्ठलगनरातील दुसऱ्या शेतात जावून पडले होते.
या आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य, कपडे, सायकल, लॅपटॉ प आणि रोख रक्कम जळून खाक झाली. आगीची तीव्रता इतकी होती की घटनास्थळी सर्व साहित्यांचा अक्षरशः कोळसा झाला होता.
Source link



