Raj Thackeray on Jain Community “तुम्हाला काय वाटतं की वर दोन गुजराती बसले आहेत, काहीही करू?”… शिवतीर्थावर जैन शिष्टमंडळाला राज ठाकरेंनी दिली ठाकरी भाषेत समज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शाब्दिक तोफेचा मारा जैन शिष्टमंडळाला थेट शिवतीर्थावर सहन करावा लागला. राजकीय पक्षांच्या नादी लागून माथी भडकावू नका. आमची डोकी भडकली तर केवढं होईल? असा संतप्त सवाल करत राज ठाकरेंनी जैन – मराठी वादावर आपली नाराजी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासूनमुंबईसहइतरत्र सोसायटीमध्ये मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्याने मुंबईत वातावरण चांगलेच तापले होते. या मुद्यांवरून याआधीही मनसे चांगलीच आक्रमक झाली होती त्यानंतर राज ठाकरेंनी पक्षाच्या मेळाव्यात जैन मुनी निलेशचंद्र यांच्यावर आपल्या ठाकरी शैलीत टीका केली होती.
राज ठाकरेंनी सांगितला उपाय
या वादाच्या पार्श्वभूमीवर जैन धर्मियांचे एक शिष्टमंडळ राज ठाकरे यांना त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटायला आले होते. या वेळी राज ठाकरे म्हणाले तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, ते निघून गेले की काढून टाका. तुम्ही पांढरे पट्टे मारत आहात. विनाकारण वाद निर्माण करत आहात. इतकी वर्ष लोक इथे राहतात. पूर्वीपासून गुजराती लोक इथे राहत आहेत, मात्र आत्ताच गेले दहा ते बारा वर्षात हे कधी सुरू झालं, असं सवाल ही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
दोन गुजराती बसलेत म्हणून…
तुम्हाला काय वाटतं की वर दोन गुजराती बसले आहेत, काहीही करू? हवंतर कापड टाका, पांढरे पट्टे कसले मारतायत? समोरच्यांच्या गोष्टी समजून घ्या. व्यापारी लोक आहात, व्यापार करा. शांततेत राहा, असा सल्ला देखील राज ठाकरेंनी जैन धर्मीयांना दिला आहे. आजपर्यंत कोणी अडवले आहे का? जैन पंथाचे मुनी माझ्या घरी येऊन गेले. तुमच्या समाजातील लोकांना समजून सांगा, असा स्पष्ट इशारा राज ठाकरेंनी जैन धर्मिय शिष्टमंडळाला दिला.
SIR संदर्भातील कामांकडे लक्ष द्या
Source link



