Pune Crime| क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं! पुण्यात शिवी दिल्याचा राग अनावर, एकाचा जागीच मृत्यू

पुणे: एखाद्याचा राग किती भयंकर असु शकतो.. याच उदाहरण देणारी बातमी समोर येत आहे…
एकाने आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाची फरशीचा दगड डोक्यात घालून हत्या केली आहे.. पुण्यातील धनकवडी परिसरात एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे…
काय आहे प्रकरण
समोर आलेल्या माहीतीनुसार, आरोपीचे नाव किरण उर्फ बिट्या रवी वाघमारे (वय २४, रा. शंकर वसाहत, संभाजीनगर) असं आहे.. पुण्यातील धनकवडी परिसरातील शंकर महाराज उड्डाणपुलाखाली किरण एका मुलासोबत दारु पीत होता.. दारू पित असतानाच किरकोळ कारणावरून त्या दोघामध्ये वादावादी झाली वादाचे रुपांतर शिवीगाळामध्ये झाली.. त्यावेळी दुसऱ्याने किरणला आईवरुन शिवी दिली म्हणुन त्याचा राग अनावर झाला आणि त्या रागाच्या भरात त्याने तिथेच पडलेला एक मोठा फरशीचा दगड उचलला आणि थेट दुसऱ्याच्या डोक्यात घातला.
हा वार इतका जबरदस्त होता की, गंभीर दुखापत झाल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडून होता. उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या नागरिकांना हा रक्ताने माखलेला मृतदेह दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.या घटनेचा पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते
Source link



