Uncategorized

Patan News | रुग्णाला भूल दिली, पण ऐनवेळी…! हेळवाक आरोग्य केंद्रात नेमकं काय घडलं?

                        हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

पाटण -पाटण तालुक्यातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे. येथे गरीब रुग्णांची उघडपणे लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांकडून एक ते दोन हजार रुपयांची मागणी केली जात आहे, पैसे न दिल्यास रुग्णाला भूल दिल्यानंतरही शस्त्रक्रिया करण्यास नकार देण्यात आल्याने डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली असल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या घटनेबाबतमिळालेल्या माहितीनुसार विभागातील एका गावातील महिलेला शस्त्रक्रियेसाठी हेळवाक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रियेसाठी २ हजार रुपयांची
मागणी केली. पैशांची पावती मागितली असता, डॉक्टरांनी ती देण्यास नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित महिलेला शस्त्रक्रियेसाठी आधीच भूल देण्यात आली होती, मात्र पैसे मिळत नाहीत हे पाहून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आणि रुग्णाला तशाच अवस्थेत सोडून दिले.

आशा सेविकांची कबुली अन् डॉक्टरांचा पळ
या प्रकरणाचा पाठपुरावा केला असता, आशा सेविकांनी कबूल केले की, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही रुग्णांना पैसे आणण्यास सांगतो. एका वृद्ध महिलेने देखील सांगितले की, त्यांच्याकडूनही शस्त्रक्रियेसाठी पैसे वसूल करण्यात आले. यावरून येथे मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत शास्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कोणतेही स्पष्टीकरण न देता आरोग्य केंद्रातून पळ काढला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली असून त्यांनी ज्या रुग्णांकडून पैसे घेतले असतील, ते तातडीने परत करण्याचे आदेश त्यांनी दिले. या आदेशानंतर आरोग्य केंद्रात एकच खळबळ उडाली होती. यानंतर डॉक्टरांची पळापळ सुरू झाली होती.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​