Uncategorized

Marriage Fraud Case एक दोन नव्हे तर २५ महिलांना लग्नाचे अमिष दाखवून लुटणारा ठक मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

लग्नाचं अमिष दाखवून एक दोन नव्हे तर तब्बल २५ महिलांना लूटणारा ठक पोलिसांच्या हाती लागला आहे. लग्नाच्या नावाखाली एक-दोन, पाच-दहा नव्हे, तर तब्बल २५ मुलींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तो अनेक वर्षे महिलांना लग्न करण्याचे आश्वासन देत, त्यांचा विश्वास संपादन करत आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचा. मुंबई पोलिसांनी ही कामगिरी केली असून या ठकाचा पुढील तपास सुरु आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार त्याने फसवणूक करुन लग्न केलेल्या २५ महिला पुढे आल्या आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अनुजकुमार चंद्रप्रकाश त्रिवेदीने वैवाहिक संकेतस्थळांवर स्वतःला एक आदर्श वर म्हणून सादर केले आणि अनेक राज्यांमधील २५ हून अधिक महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.

तपासकर्त्यांच्या मते, अनुजकुमारने विशेषतः घटस्फोटित आणि असहाय्य महिलांना लक्ष्य केले. त्याने बनावट ओळख आणि भावनिक जाळ्यात ओढून एक मोठा स्कॅम घडवून आणला.

मीरा भाईंदर-वसई विरारचे पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे यांनी सांगितले की, आरोपीचा शोध उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे लागला. तो बनावट ओळखीने राहत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला २४ मे रोजी अटक केली. तपासादरम्यान असे आढळून आले की, तो अजय अग्रवाल, अजय संतोष सिंग आणि जयप्रकाश रमेशचंद गुप्ता यांसह अनेक टोपणनावे वापरत होता.

अनुज कुमार कशी करायचा फसवणूक

मार्च २०२२ मध्ये एका ७५ वर्षीय महिलेने नयनगर पोलिसांशी संपर्क साधल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. तक्रारीनुसार, आरोपीने त्या महिलेच्या ४५ वर्षीय मुलीसाठी जोडीदार शोधणाऱ्या एका वैवाहिक जाहिरातीला प्रतिसाद दिला होता. अजय अग्रवाल असल्याचे भासवून, त्याने मार्च २०१९ मध्ये तिच्याशी लग्न केल्याचा आरोप आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​