Uncategorized

Maratha Reservation कोल्हापूर गॅझेटच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, सर्वपक्षीय समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

मराठा आणि कुणबी एकच समाज असल्याचे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने ब्रिटीशकालीन कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करावी. राज्यातील सर्व मराठा समाजाला कोल्हापूर गॅझेटच्या आधारेच कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी कोल्हापूर गॅझेट अंमलबजावणी सर्वपक्षीय समितीने सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

समितीच्या निवेदनात, इंग्रजांनी १८८६ मध्ये तयार केलेल्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या ऐतिहासिक नोंदींचा आधार घेऊन कोल्हापूरसह राज्यातील मराठा समाजाला ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता येईल. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळाले पाहिजे, या भूमिकेवरही समिती ठाम असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने यापूर्वी हैदराबाद गॅझेटचा आधार स्वीकारून त्याची अंमलबजावणी केल्याचा उल्लेख केला.

त्याच धर्तीवर कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे अॅड. बाबा इंदुलकर यांनी सांगितले. कोल्हापूर गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदींचा विचार करून राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, दिलीप देसाई, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत, माजी नगरसेवक अनिल कदम, अशोक भंडारे, हर्षल सुर्वे, विजय पाटील, गीता हासूरकर आदी उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​