Uncategorized

Malvan News: सोने तारण फसवणूक प्रकरणात संशयित एजंट हर्षदा आडकरला अटक; 4 दिवसांची पोलिस कोठडी

मालवण : नागरिकांचे सोन्याचे दागिने तारण ठेवून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत तब्बल 6 कोटी 9 लाख 61 हजार 515 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी व एजंट हर्षदा रमाकांत आडकर हिला पोलिसांनी शुक्रवारी (दि. 11 सप्टेंबर) अटक केली. न्यायालयात हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांनी तिला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणी कोळंब गावच्या सरपंच सिया रामचंद्र धुरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ‘मुथ्थूट फिनकॉर्प’च्या मालवण शाखेच्या व्यवस्थापक स्नेहा निहाल जामसंडेकर, कर्मचारी तन्मय मंगेश पराडकर, स्नेहल राजन आचरेकर आणि एजंट हर्षदा रमाकांत आडकर या चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता, 2023 मधील विविध कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हर्षदा आडकर हिला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी तिला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. रुपेश देसाई यांनी न्यायालयात बाजू मांडली. मूळ फिर्यादीतर्फे ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर, ॲड. तारिका चिंदरकर-कुबल, ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर, ॲड. पलाश चव्हाण आणि ॲड. विवेक कुमार निषाद यांनी सरकार पक्षाला सहाय्य केले.

दरम्यान, या प्रकरणातील अन्य संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सोन्याचे दागिने तारण ठेवून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत 120 हून अधिक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​