Uncategorized

मंत्री जारकीहोळी यांची काँगोतील सोने खाणकाम व्यवसायात भागिदारी

कुटुंबीय, निकटवर्तीयांच्या 21 ठिकाणी शोधमोहीम : 3.3 कोटी रुपयांची रोकड, 15 लाखांचे विदेशी चलन जप्त

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, कुटुंबीय आणि त्यांचे निकटवर्तीय अशा एकूण 21 ठिकाणी ईडीच्या बेंगळूर विभागीय कार्यालयाने बुधवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस शोधमोहीम राबविली. यावेळी सतीश जारकीहोळी यांनी काँगो येथील सोन्याच्या खाणकाम व्यवसायात 40 टक्के भागिदारी घेतल्याचे समोर आले आहे. तसेच आफ्रिकेत खाणकाम, मालमत्ता असलेल्या इतर विदेशी कंपन्यांची कागदपत्रे सापडली आहेत. 3.3 कोटी रुपयांची रोकड, अमेरिकन डॉलर्स, युरो इत्यादी सारखे 15 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. यासह आणखी काही महत्त्वाची माहिती ईडीने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकातून उघड केली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) बेंगळूर विभागीय कार्यालयाने बुधवार दि. 9 आणि गुरुवार दि. 10 रोजी दोन दिवस पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित बेंगळूर, बेळगाव, गोकाक, कोलकाता या चार ठिकाणांवरील 21 जागांवर शोधमोहीम राबविली. जारकीहोळी कुटुंबीयांच्या कथित अघोषित परदेशी गुंतवणुकी, विदेशी व्यावसायिक संबंध आणि संशयास्पद आर्थिक अनियमितांची चौकशी निश्चिती करण्यासाठी परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) तरतुदीनुसार ही शोधमोहीम राबविण्यात आली.

या शोधमोहिमेत चिकोडीच्या खासदार असलेल्या मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी, मुलगा राहुल जारकीहोळी, भावोजी वाय. डी. मंजुनाथ यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त मंत्री जारकीहोळी यांचे खासगी स्वीय साहाय्यक मलगौडा पाटील, राजू दरगशेट्टी, विठ्ठल परसन्नावर, डॉ. गिरीश सोनवालकर यांच्यासह त्यांच्या अनेक निकटवर्तीयांच्या मालमत्तांची झडती घेण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा मिळविण्यासाठी एका कंपनीने मोठी लाच दिल्याचा आरोप आहे. ज्याचा वापर परदेशी मालमत्ता खरेदी करण्यात आला.

या आरोपावरून मे. भारत वाणिज्य इस्टर्न प्रा. लि. (बीव्हीईपीएल) या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांचीही झडती घेण्यात आली. शोधकार्यादरम्यान बीव्हीईपीएलच्या मालकांची कार्यालये आणि निवासस्थाने तपासण्यात आली. मंत्री जारकीहोळी यांचे नातेवाईक व कुटुंबीय म्हणजेच त्यांची कन्या प्रियांका जारकीहोळी, मुलगा राहुल जारकीहोळी, बहीण महादेव मंजुनाथ यांच्याशी संबंधितही शोधमोहीम राबविण्यात आली. वाय. डी. मंजुनाथ यांनी मे. एल्डोराडो मायनिंग रिसोर्सेस काँगो आणि मे. नावा ऑरम मायनिंग लि., झांबिया इत्यादी अनेक विदेशी कंपन्यांमध्ये भागभांडवल संपादन केले आहे.

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सोन्याच्या खाणकामाच्या व्यवसायात असलेल्या मे. मॅग्निट्यूड स्टार एसएआरएल, काँगो या कंपनीत जवळपास 40 टक्के भागिदारी संपादन केल्याचे उघडकीस आले आहे. आफ्रिकेत खाणकाम मालमत्ता असलेल्या इतर विविध परदेशी कंपन्यांची कागदपत्रेही सापडली असल्याने ती जप्त करण्यात आली आहेत.

गोकाक, डॉलर्स कॉलनी येथील मंत्री जारकीहोळी यांची निवासस्थाने आणि बेंगळूरमधील क्रेसेंट रोडवरील त्यांचे कार्यालय, निवासस्थान, गोकाक आणि बेळगाव येथील मालमत्तांसह अनेक ठिकाणी एकाचवेळी चालविलेल्या या शोधमोहिमेदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी फेमाअंतर्गत उल्लंघनाशी संबंधित महत्त्वपूर्ण जप्ती केली आहे. केलेल्या शोधमोहिमेत 3.3 कोटी रुपयांची रोकड, अमेरिकन डॉलर्स, युरो इत्यादी सारखे 15 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.

तसेच शोधमोहिमेदरम्यान गोळा केलेल्या पुराव्यावरून असे उघड झाले आहे की काँगोमधील एका संस्थेमध्ये अनधिकृत मार्गाने मोठ्या प्रमाणात रोख गुंतवणूक-खर्च करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अनियमिततेशी संबंधित पुरावे आणि मंत्री जारकीहोळी यांचे भावोजी अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त वाय. डी. मंजुनाथ यांच्या नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली असलेल्या संस्थेच्या खात्यासह विविध प्रभावशाली व्यक्तींच्या संस्था आणि खात्यांमधील बीव्हीईपीएलसारख्या कंत्राटदारांकडून लाच गोळा करण्याशी संबंधित डिजिटल उपकरणांसह अनेक दस्तऐवज, साहित्यदेखील उघडकीस आले आहे. या छाप्यासंबंधी पुढील तपास सुरू असल्याचे ईडीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे शुक्रवारी कळविले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​