Uncategorized

Maharashtra Politics शिवसेनेत येणे ठरले ओमराजेंसाठी फायद्याचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला १८ कोटींचा निधी मंजूर

गेला आठवडाभर महाराष्ट्रात राजकीय भूकंपांनी वातावरण तापलेले दिसते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदारांनी अचानक बंड केले आणि शिवसेना एकनाथ शिंदेच्या पक्षात प्रवेश केला. या ६ खासदारांमध्ये उद्धव ठाकरेंचे निकटवर्तिय समजले जाणारे धाराशिवचे खा. ओमराजे निंबाळकर यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

मला साधा ट्रान्सफार्मरही बदलता येत नव्हता खासदार असून कामे करता येत नव्हती अशी कारणे पक्ष सोडताना ओमराजे निंबाळकरांनी दिली होती. पण आता मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जाताच खा. निंबाळकरांना १८ कोटींचा विकासनिधी त्वरीत देण्यात आला आहे.   

धाराशिवची शिवसेना कार्यकारिणी बरखास्त

ओमराजे निंबाळकर यांनी पक्षप्रवेश करताच शिवसेनेच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या. आणि आता थेट एकनाथ शिंदे यांनी तातडीने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील वेगवेगळ्या विकासकामांसाठी वापरला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान २०२४ साली लोकसभा निवडणूकीत खा. ओमराजेंच्या विरोधात  उभ्या ठाकलेल्या आणि सध्या धाराशिव जिल्हापरिषदेच्या अध्य़क्ष असलेल्या अर्चना पाटील यांची ओमराजेंच्या महायुतीतील प्रवेशावर प्रतिक्रिया काय असेल याकडे जिल्ह्याचे लक्ष होते. पण अर्चना पाटील यांनी ओमराजेंचं स्वागत करत भविष्यात त्यांना महायुतीने संधी दिली तर आपण सोबत असल्याचे जाहीररित्या सांगितले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​