Uncategorized

Bangluru Crime पाण्याच्या नळाचा वाद अन् पेईंग गेस्टनी डोक्यात बॅट घालून घेतला घरमालकाचा जीव

बंगरुळूमध्ये पाण्याच्या नळावरुन झालेल्या वादातून दोन पेईंग गेस्टनी घरमालकाची मारहाण करत हत्या केल्याची घटना समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार पूर्व बंगळूरुमध्ये पाण्याच्या नळावर पाय धुण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर सोमवारी झालेल्या मारामारीत एका पेइंग गेस्ट निवासस्थानाच्या मालकाची हत्या केल्याप्रकरणी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.

पीडित, ३७ वर्षीय माधव मेटली, हे कस्तुरीनगर मेन रोडवरील पीजीचे मालक होते, जिथे सायंकाळी सुमारे ६.३० वाजता ही घटना घडली. आरोपींची ओळख २१ वर्षीय राकेश आणि २० वर्षीय डॉन ब्राइटसन अशी पटली आहे.

“दोघे आरोपी मित्र असून वेगवेगळ्या पीजीमध्ये राहत होते. ते पीजीच्या आवारात शिरले आणि एका नळावर पाय धुवू लागले, तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाला,” अशी माहिती राममूर्ती नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जी. जे. सतीश यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक मेटली यांनी या कृत्याला विरोध केला आणि त्या दोघांना जाब विचारला, त्यानंतर हा हल्ला झाला . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वादादरम्यान घरमालकाने क्रिकेट बॅट उचलली होती, परंतु दोन्ही आरोपींनी ती त्याच्याकडून हिसकावून घेतली आणि घरमालक मेटली यांनाच जबर मारहाण केली. या मारहाणीत घरमालक मेटली गंभीर जखमी झाला.

त्याला तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. व्हाईटफील्ड रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी एका खाजगी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असून, घटना घडली तेव्हा ते दारूच्या नशेत होते,. पीडित व्यक्तीला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच घरमालक मेटली यांचे निधन झाले होते.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी करत आहेत तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे,” असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​