Uncategorized

Kolhapur Irrigation News कोल्हापूर जिल्हातील नद्यांमधून उपसाबंदीचा निर्णय अखेर पाटबंधारे विभागाने केला रद्द

कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांमधून उपसाबंदीचा निर्णय २४ तासाच्या आत पाटबंधारे विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दिली. सोमवारी संध्याकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांंमधून पाणी उपसा करण्यास मनाई करणारा आदेश पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला होता.

या आदेशाची माहिती मिळताच अनेक शेतकऱ्यांनी सिंचन भवन येथे संंबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन उपसाबंदीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी शेतकऱ्यांनी सिंचन भवनाच्या आवारात ठिय्या मारल्याने अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागला.

यावेळी आयोजित बैठकीत विभागाच्या अधिकारी ज्योती देवकर यांनी दूधगंगा वगळता अन्य नद्यांमधील पाणी उपसा बंदीचा निर्णय रद्द करत असून तसा लेखी आदेश देण्याचे आश्वासन दिले. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा नदी पात्रात सर्वात कमी जलसाठा असल्यामुळे त्या नदीतला उपसाबंदीची अंमलबजावणी १८ जूनपासून सुरु करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र उपसाबंदी रद्द करण्याचा हा आदेश तात्पुरता स्थगित केला आहे.

दूधगंगेची गळती न काढल्याचा आरोप

गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादला जातोय मात्र आमच्या शेतीसाठी उपयुक्त असणारे दूधगंगा धरण मात्र गळके ठेवले जाते असा प्रकार सुरु असल्याचा आरोप शेतकरी नेते शिवाजीराव मगदूम यांनी केला. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा असून पिकांवर संकट निर्माण झाले असते अशी भावना बाबासाहेब देवकर यांनी व्यक्त केली.

 यावेळी पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी उपसाबंदीचा निर्णय तात्पुरता रद्द करत असल्याची  माहिती दिली. यावेळी जिल्हापरिषद सदस्य माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हा परिषद सदस्य राजू सुर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​