Uncategorized

Kolhapur DM Visited Radhanagri जिल्हाधिकारी विजय राठोड यांची राधानगरीत अचानक भेट, तहसील कार्यालय, खत बुकिंग केंद्र व धरणाची पाहणी

राधानगरी/ प्रतिनिधी
कोल्हापूरचे  जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी गुरुवारी राधानगरी येथे अचानक भेट देत विविध शासकीय यंत्रणांच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नव्या तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करून बांधकामाच्या गुणवत्तेबाबत तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी राठोड यांनी राधानगरीतील एका शेती सेवा केंद्राला भेट देऊन फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल अंतर्गत सुरू असलेल्या ऑनलाइन खत बुकिंग प्रणालीची प्रत्यक्ष पाहणी केली. खत विक्री व वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध करून देणे आणि ऑनलाइन नोंदी अचूक ठेवण्याबाबत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान शेतकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राधानगरी धरणालाही भेट देऊन धरणातील पाणीसाठा, सुरक्षाव्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. संभाव्य अतिवृष्टीच्या परिस्थितीत संबंधित विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
अचानक झालेल्या या दौऱ्यात जिल्हाधिकारी राठोड यांनी विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेत नागरिकांना दर्जेदार व तत्पर सेवा देण्यावर भर देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगले,तहसीलदार अनिता देशमुख, गटविकास अधिकारी डॉ, संदीप भंडारी, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे, उपकार्यकारी अधिकारी प्रविण पारकर, शाखा अभियंता समीर निरूखे, मंडल अधिकारी सीमा मोरये,युवराज पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​