Uncategorized

Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; हुडीवाल्या ‘त्या’ व्यक्तीचं रहस्य अखेर उघड!

पुणे – केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नव नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो.. रोज कोणताना कोणता धक्कादायक खुलासा होत आहे.. पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. उद्यापर्यंत दोघेही पोलीस कोठडीत आहेत. पोलीस विविध बाजूने तपास करत आहेत. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. डिजिटल पुराव्यांसह सीन रिक्रएशनही करण्यात आले. दोघांनाही लोहगडावरून नेऊन पोलिसांनी पुतळा फेकायला लावण्यात आला. आता याप्रकरणात अजून एक खुलासा समोर येत आहे.

सीसीटीव्ही फुटेचमध्ये जो व्यक्ती दिसत आहे.. ज्याने हुडी आणि मास्क घातला होता तो व्यक्ती हा चेतन असल्याचे तपासादरम्यान सिध्द झाले आहे.. परंतु चेतन त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वेगळी कपडे घातले आहे.. त्यांनतर वेगळी कपडे घातले आहे.. त्याला कुणी ओळखु नये यासाठी परंतु यामध्ये त्याला तिसऱ्या कुणी मदत केली आहे. त्याने हे कपडे कुठे बदलले आणि हे कपडे कुठे लपवले याचा शोध पोलीस घेत आहेत.सर्व अॅगलने पोलीस तपास करायला सुरुवात केली आहे.. या प्रकरणात पोलिसांचा रोख नेमका कोणाकडे असणार आहे.. कारण सियाचे आई,वडील, भावाची कसुन तपास सुरु आहे.. या दरम्यान सियाचा भाऊ हा चेतनचा मित्र असल्याचे निष्पण झाल्याचे समोर आले आहे..

याप्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनाआता तिसऱ्यांदा न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. उद्या दोघांची पोलीस कोठडी संपत आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत त्यांना पाच दिवसांची (3 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. पोलीस दोघांविरोधात भक्कम पुरावे गोळा करत आहेत. डिजिटल पुराव्यांची मोठी मालिकाच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. डिलिट केलेल्या चॅटमधून मोठा पुरावा हाती लागण्याची शक्यता आहे.

 

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​