Uncategorized

Ketan Agrawal Murder “तर आमच्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या” केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सियाचे आई- वडिल असं का म्हणाले?

पुण्याच्या केतन अग्रवाल प्रकरणात आता सिया गोयलच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. काही दिवसांवर लग्न आलेलं असताना सियाने प्रियकर चेतन चौधरीसोबत कट रचून भावी पती केतन अग्रवालची लोहगडावरुन ढकलून हत्या केली. सुरुवातीचा अपघाताचा बनाव केलेली ही हत्या पोलिसांच्या तपासात उघड झाली. 

केतनच्या हत्येनंतर त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने देशभर मोठी खळबळ माजली. मुळातच उद्योगपती कुटूंबातील तरुणांमध्ये इतकी विकृती कुठून येते हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिला. या घटनेवर केतनचे वडिल व्यक्त झाले आणि त्यांनी सियाला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दुसऱ्या बाजूला सियाच्या आई वडिलांनीही या दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रिया देत आम्ही सियाचा प्रियकर असणाऱ्या चेतनला ओळखतही नव्हतो असं सांगितलं तर आता सियाच्या आईनेही आपल्या मुलीवर राग व्यक्त करणारी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

सियाची आई म्हणाली

“यामध्ये जो कोणी दोषी असेल तर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, मग माझी मुलगी का असेना. माझ्या मुलीचा दोष असेल तर माझ्या मुलीला लोहगडावर केतनला जिथून ढकलून दिले होते तिथूनच ढकला, असे सियाची आई पूजा गोयल यांनी म्हटले

“मी आजपर्यंत चेतन चौधरी याचा चेहरा पाहिलेला नाही. मी त्याला कधी भेटलो किंवा त्याच्याशी कधी बोललोही नाही. तो कधी घरीही आला नव्हता. किंबुहान आम्ही कधी सियाच्या तोंडून त्याचं नावंही ऐकले नव्हते, असेही सिया गोयल हिच्या वडिलांनी स्पष्ट केले. सियाच्या वडिलांनी केतन अग्रवाल याच्या कुटुंबाबत बोलताना म्हटले की, ते चांगले आणि संस्कारी लोक आहेत.

सियाचे वडील भावूक

आमचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. देवीचंद  हे अनेकदा आमच्या ड्रायफुटचा व्यवसाय असणाऱ्या दुकानात यायचे, खूप सामान घेऊन जायचे. ते स्वभावाला खूप चांगले होते. या घटनेमुळे आम्ही एका चांगल्या कुटुंबाशी नातेसंबंध सोडण्याची संधी आणि एक मुलगा गमावला आहे. मला या पलीकडे काही बोलायचे नाही, असे सिया गोयल हिच्या वडिलांनी सांगितले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​