Kas Lake | कास परिसरात बोटिंग करताना अचानक वारे सुटले अन्…;

कास तलावातील बोटिंगमध्ये सुरक्षेचा बोजवारा;
कास: कास तलावात नौकाविहारचाआनंद लुटण्यासाठी कास बोंटीगबर पर्यकांची वर्दळ वाढू लागली असून अनेक पर्यटक पाण्यांच्या लाटांबार स्वार होत बिना जॅकेट जीवघेण्या स्थितीत बोटिंग करताना पहायला मिळत असल्याने पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. एखादा अपघात घडल्यावरच संबधित ठेकेदाराला जाग येणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
कास परिसर म्हटले की, पर्यटनाची पर्वणीच त्यात उन्हाळ्याच्या सुट्टी काळात कास तलावात बोटींगसाठी पर्यटकांची बर्दळ वाढू लागली असून परिसरात येणारे पर्यटक बॉटीगला अधिक पसंती देत नौकाविहाराचा आनंद लुटत असले तरी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरुवातीला नियमांच्या चौकटीतच बॉटीग व्यवसाय करणार असल्याच्या बतावण्या करणारा ठेकेदार तिकीट फाडण्यातच व्यस्त दिसून येत आहे.एक महिन्यापुर्वी कोयना जलायशयामध्ये तपोळा परिसरातपर्यटकांची बोट पलटी तिन जण बुडाले.
त्यातील सेप्टी जॅकेट परिधान केल्यामुळे दोन पर्यटक बचावले. मात्र बिना जॅकेट असणाऱ्या स्थानिक बोट चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. असे असतानाही कास तलावामधील बोटींगमध्ये पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. बिना जैकेट पर्यटक बोंटीग करताना फोटोसाठी स्टंटबाजी करणे, वाऱ्याच्या वेगात लाटा उसळत असताना बिना चालक बोटींग करणे आदी प्रकार सर्रास सुरु आहेत. ठेकेदार अपघाताची वाट पाहतोय की काय असा सवाल होत आहे.
वाऱ्याच्या वेगामुळे पायंडल बोटी लटपटण्याची शक्यता
पावसाळ्या पुर्वी वाहणारे वारे कास परिसरात अधुन मधुन जोराने वाहत असून कास तलावातील पाण्याच्या लाटा उसळत आहेत. त्यात पर्यटकांच्या चालकाविना जाणाऱ्या दोन हलक्या पायंडल बोटी लटपटण्याची शक्यता नकारता येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
Source link



