instagram Viral Video “रात्रीचा १ वाजतोय आणि इथे कुणाचाही त्रास नाही” भारतीय महिलेने सांगितलं तिथे का सुरक्षित वाटतंय…

देशभरात अलिकडच्या काळात महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असताना एका महिलेने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओची सध्या सोशल मिडीयावक चर्चा सुरु आहे. शुभांगी व्यास या नावाने इन्स्टाग्रामवर नाव असणाऱ्या एका भारतीय महिलेने परदेशातून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ती त्या देशातले वातावरण महिलांसाठी किती सुरक्षित आहे याची माहिती सांगत आहे.
फ्रान्समध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेने रात्री उशिरा एकटीने घरी परततानाचा स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर ऑनलाइन चर्चेला सुरुवात झाली आहे. या व्हिडीओमध्ये तिने रात्री १ वाजता घरी परतताना सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले आहे.
“म्हणून मला फ्रान्स आवडतो”
व्हिडिओमध्ये व्यास रात्रीच्या वेळी एका शांत रस्त्यावरून फिरताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्या आई-वडिलांनी हा व्हिडिओ पाहिला तर ते माझ्याशी बोलणार नाहीत, पण बघा, रात्रीचे एक वाजले आहेत. मी एकटीच, छोटा ड्रेस घालून घरी परत चालले आहे आणि मला त्रास द्यायला इथे कोणीही नाही. म्हणूनच मला फ्रान्स आवडतो.”
इंडिया मे ऐसा होगा क्या?
क्लिपवर लिहिलेल्या मजकुरात म्हटले होते, “India me aisa kab hoga,” तर कॅप्शनमध्ये म्हटले होते, “भारतातील मुलींना इतके सुरक्षित वाटेल त्या दिवसाची वाट पाहत आहे.” हा व्हिडिओ बघता बघता व्हायरल झाला आणि अनेक युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया युजर्सना भावलेला दिसला. कारण त्यात सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा विषय हाताळला होता.
युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया
मात्र, या क्लिपमुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, कारण अनेक युजर्सनी असे निदर्शनास आणले की, एकाच देशातसुद्धा सुरक्षितता ठिकाणानुसार बदलू शकते. काहींनी तिच्या मताशी सहमती दर्शवली, तर इतरांना असे वाटले की, पॅरिससारख्या शहरांसह फ्रान्स देश, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नेहमीच सुरक्षित असेलच असे नाही.
Source link



