Uncategorized

“आम्हाला वाटलं नव्हतं भस्मासूर ज्योतिषी होईल” गौरव भाटियांची राहुल गांधींवर जोरदार टीका

भाजप नेते गौरव भाटिया यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे टुलकिट पॉलिटिक्स पसरवत असून ते बेजबाबदार आरोप करत असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचे भाटिया यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागात सल्लागार परिषदेच्या बैठकीत राहुल गांधी असं म्हणाले होते की, “देशाची अर्थव्यवस्था अशीच राहिली तर पुढच्या वर्षभरात सरकार कोसळेल”

भस्मासूर आणि ज्योतिषी

विरोधी पक्षाने अलीकडच्या काळात केलेल्या टीकात्मक वक्तव्यांचा संदर्भ देत, गौरव भाटिया यांनी ही चुकीची वक्तव्ये पसरण्याची पद्धती असल्याचे म्हटले आहे.

पत्रकार परिषदे दरम्यान गौरव भाटिया म्हणाले “काल आणखी एका टुलकिट ची चर्चा झाली ज्यात म्हटले आहे की, देशाच्या जनतेची पूर्ण ताकदीने सेवा करणारे हे सरकार वर्षभरात पडेल, भस्मासूर राहुल गांधी, आम्हाला माहित नव्हते की, भस्मासूर ज्योतिषी होईल राहुल गांधी हे परस्परविरोधी वक्तव्ये करत असून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत. राहुल गांधींनी नुकत्याच सुरु असलेल्या एका सभेत एक वक्तव्य केलं आणि बाहेर दुसरंच वक्तव्य केलं, ही दुर्देवी गोष्ट असल्याचे मानले जात आहे.”

जगाची अर्थव्यवस्था आणि भारत

पुढे बोलताना भाटिया म्हणाले की, जग सध्या आर्थिक संकटातून जात असताना भारत मजबूत स्थितीत आहे. गेल्या काही काळापासून जग संकटातून जात असून अनेक मोठ्या देशांची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे, मात्र असे असताना भारत मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेले ८५ दिवस अत्यंत स्थिरपणे उभा आहे.

जर राहुल गांधींचा उद्देश भारतात अराजकता पसरवण्याचा असेल तर आम्हीही भारताला मजबूत ठेवण्यासाठी निर्धार करतो. तुम्ही तुमचा सर्वोत्तम प्रयत्न करा पण भारताला पुढे नेण्यासाठी आम्ही तितकेच दृढनिश्चयी आहोत असेही भाटिया म्हणाले.

दरम्यान जगभरातील तेलाच्या बाजारातील अस्थिरता आणि पश्चिम आशियातील अमेरिका- इराण यांच्यातील तणाव आणि युद्धजन्य स्थितीमुळे गेल्या १० दिवसात चौथ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. सध्या दिल्लीत पेट्रोलचे दर १०२.६२ इतके झाले आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​