Uncategorized

Gorakshak Leader Attacked मडगावमध्ये गोरक्षक प्रमुखावर हल्ला, बजरंग दलाचा दावोर्लिम पोलिस ठाण्यावर मोर्चा

मडगाव येथील एका फास्ट फूड आउटलेटमध्ये गोररक्षक गोवा प्रमुख रवींद्र रेडकर यांच्यावर कथितरित्या हल्ला झाल्यानंतर शनिवारी रुमदामोल-दावोरलीममध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि दोन मंदिरांजवळ चालणाऱ्या बेकायदेशीर स्टॉल्सवर कारवाईच्या मागणीसाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. बुधवारी रात्री घडलेली ही घटना, दुकानात आलेल्या दोन लोकांना मेन्यू कार्ड देण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून सुरू झाली.

रविंद्र रेडकर यांना मारहाण

वादाची माहिती मिळताच गोरक्षक प्रमुख रविंद्र  रेडकर घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, गोवा विभागीय समन्वयक विराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दावोर्लीम पोलीस चौकीवर मोर्चा काढला आणि रुमदामोल हाउसिंग बोर्डाजवळील मारुती मंदिर व स्वामी समर्थ मंदिराच्या (समर्थ गड) परिसरात चालणाऱ्या बेकायदेशीर मांसाहारी स्टॉल्सवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

गोमांस विकणारे स्टॉल्स असल्याचा आरोप

बजरंद दलाने सादर केलेल्या निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की, दोन प्रार्थनास्थळांजवळ गोमांसासह मांसाहारी खाद्यपदार्थ विकणारे अनधिकृत स्टॉल्स सुरू असून, त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे आणि धार्मिक वातावरण बिघडत आहे. त्यात पुढे स्वच्छतेचा अभाव, सार्वजनिक वाहतुकीतील अडथळा आणि अनधिकृत पाणी व वीज जोडण्यांच्या संशयास्पद वापराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व परवाने आणि मंजुऱ्यांची पडताळणी करावी अशी मागणी केली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​