Gokul Upcomimg Election महायुतीचं ठरलं, गोकुळच्या आगामी निवडणूकीसाठी सर्व नेतेमंडळी सज्ज

गेले काही काळ कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाला वादाचे ग्रहण लागले होते. प्रशासक नियुक्ती ते कारभारातील गैरव्यवहार असे अनेक मुद्दे या वादाच्या केंद्रस्थानी होते. गोकुळचे कारभारी म्हणून हसन मुश्रीफ यांंच्यावर महायुतीचेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी टीका केली होती. आता मात्र आगामी निवडणूकीसाठी महायुती म्हणून सगळे एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.
आगामी निवडणूकीसाठी महायुती सज्ज
गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. आज कोल्हापूरमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत गोकुळची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच एकत्रित लढवायची, यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले.
महायुतीच्या सर्वच नेत्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीला कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमीत कदम यांच्यासह महायुतीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली.
आजची ही बैठक अतिशय सकारात्मक वातावरणात झाली असून ह्या बैठकीत निवडणूक महायुतीमधील सर्व घटक पक्ष मिळून पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय झाला. महायुतीचे सर्व घटक पक्ष गोकुळची निवडणूक छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी ह्या नावाने लढवणार, असल्याची माहिती माजी मंत्री विनय कोरे यांनी बैठकीनंतर दिली.
Source link



